मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

New year 2021 Horoscope Scorpio: पैशांची आवक वाढेल! वृश्चिक राशीसाठी कसं असेल नवं वर्ष

New year 2021 Horoscope Scorpio: पैशांची आवक वाढेल! वृश्चिक राशीसाठी कसं असेल नवं वर्ष

Rashifal Scorpio: राशीभविष्य (Horoscope 2021) तुमचं भविष्य बदलू शकत नसलं तरी त्यातील खाचखळगे नक्की सांगू शकतं. जाणून घ्या वृश्चिक राशीचं भविष्य

Rashifal Scorpio: राशीभविष्य (Horoscope 2021) तुमचं भविष्य बदलू शकत नसलं तरी त्यातील खाचखळगे नक्की सांगू शकतं. जाणून घ्या वृश्चिक राशीचं भविष्य

Rashifal Scorpio: राशीभविष्य (Horoscope 2021) तुमचं भविष्य बदलू शकत नसलं तरी त्यातील खाचखळगे नक्की सांगू शकतं. जाणून घ्या वृश्चिक राशीचं भविष्य

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 31 डिसेंबर : नव्या वर्षाच्या आगमनासह सगळ्यांच्याच मनात नव्या आशा पल्लवीत होतात. नवं वर्ष जुन्या वर्षाहून अधिक चांगलं, प्रगतीचं असावं यासाठीही हरेकजण प्रयत्न करतो. 2020 कोरोनाग्रस्त गेलं मात्र 2021 बाबत सगळ्यांच्याच मनात नवी उमेद जागती आहे. येत्या वर्षात तुमचं भविष्य (Horoscope) राशीनुसार कसं असेल हे जाणून घेत त्यानुसार तुम्ही नियोजन (planning) केलं तर अधिक चांगलं असेल. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या राशींचं सविस्तर भविष्य. वृश्चिक (Scorpio) राशीसाठी कसं असेल नवं वर्ष (new year) जाणून घ्या. करियर आणि व्यवसाय वृश्चिक राशीसाठी करियरमध्ये चमकायचं असेल तर गरज आहे मोठ्या मेहनतीची. यावर्षी तुम्ही प्रत्येक काम टाळण्याचा प्रयत्न कराल, कारण आळस आपला प्रभाव तुमच्यावर दाखवेल. २०२१ मध्ये जुलैनंतर तुमचं करियर जरा चांगलं वळण घेईल. आळसावर विजय मिळवणारी व्यक्ती मात्र आपल्या क्षेत्रात नक्कीच मोठं ध्येय गाठेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं राहील. तुम्हाला मनपसंत डील मिळेल. यातून व्यवसाय उभारी घेईल. आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्य तुम्हाला आर्थिक क्षेत्रात चांगलं फळ मिळेल. पैशाची आवक सुरू राहील मात्र खर्चापेक्षा जास्त बचत करू शकाल. यावर्षी जमीन-घर यांच्याशी संबंधित वादांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकतं. या राशींच्या व्यक्तींचं प्रेमजीवन सामान्य राहील. काहींच्या घरी मंगलकार्य घडू शकतात. काही लोकांना आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन या राशीच्या लोकांना यंदा प्रेमात परीक्षा द्यावी लागेल. तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी सतत तुम्हाला अजमावत राहील. प्रेमी तुमच्याशी प्रामाणिक असल्यास हे वर्ष छान जाईल. मात्र केवळ वेळ घालवण्यासाठी जे प्रेमाचं नाटक करतात ते संकटात सापडू शकतात. विवाहित लोकांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराचं बिघडलेलं आरोग्य हे यामागचं कारण असेल. शिवाय दोघांमध्ये सामंजस्याचा अभावही जाणवेल. जोडीदाराला नीटपणे वेळ दिला तर यातून मार्ग निघू शकतो. शिक्षण आणि आरोग्य या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात काही अडथळे येतील. काही विषयांवर तुमची पकड चांगली असेल मात्र काहींमध्ये खूप कष्ट घ्यावं लागेल. आई-वडील किंवा सोबतच्या अभ्यासू मित्रांच्या मदतीनं तुम्ही कठीण विषय समजावून घ्या. संकोच सोडून मोकळेपणानं मदत घ्या. आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या. लहान-मोठ्या कुठल्याच आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा कठीण परिस्थिती ओढवू शकते. नव्या वर्षाच्या तुम्हाला सदिच्छा!
First published:

Tags: Astrology and horoscope, Happy New Year 2021, Scorpio

पुढील बातम्या