Home /News /lifestyle /

लिहिता लिहिता डिसइन्फेक्ट होणार हात; कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Sanitizer Pen ची मदत

लिहिता लिहिता डिसइन्फेक्ट होणार हात; कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Sanitizer Pen ची मदत

सॅनिटायझरच्या बाटलीप्रमाणे आता पेनमध्येही सॅनिटायझर (hand sanitizer pen) उपलब्ध झाला आहे.

    लखनौ, 26 जुलै : कोरोनाच्या (CORONAVIRUS) या परिस्थितीत आपल्या प्रत्येकाकडे सध्या दोन गोष्टी सातत्याने जवळ असतात एक म्हणजे मास्क (MASK) आणि दुसरं म्हणजे हँड सॅनिटायझर (HAND SANITIZER). घरात तर आपण हँडवॉश किंवा साबणाने हात धुतो. मात्र घराबाहेर हात स्वच्छ करण्यासाठी आणि निर्जंतुक ठेवण्यासाठी आपल्याला मदत होती हँड सॅनिटायझरची. त्यामुळे खिशात, पाकिटात, बॅगेत हँड सॅनिटायझरची बाटली असतेच आणि आता सॅनिटायझर पेनही (SANITIZER PEN) उपलब्ध झालं आहे. सध्या असलेली सॅनिटायझरची गरज लक्षात घेता लखनौमध्ये सॅनिटायझर पेन तयार करण्यात आलं आहे. ज्याने तुम्हाला लिहिताही येणार आहे आणि सोबतच लिहिता लिहिता तुमचे हातही स्वच्च होण्यास मदत होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मेडिशिल्ड हेल्थकेअरचे डॉ. फराज हसन म्हणाले, "याआधी सॅनिटायझरचा फारसा वापर होत नव्हता. मात्र आता ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. प्रत्येकाच्या गरजाही वेगळ्या आहेत. एक व्यावसायकि म्हणून आम्हाला त्यांची काळजी आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझर ठेवतो. तसाच हा सॅनिटायझर पेन आहे. सॅनिटायझर पेन विद्यार्थी आणि ऑफिसला जाणाऱ्या व्य्कतींसाठी खूप उपयोगाचा आहे" हे वाचा - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चीनचा खास डायट! तुम्ही करा आहारात सामील या पेनाने तुम्ही लिहू शकता शिवाय हातही सॅनिटायझ करू शकता. यामुळे तीन तासांपर्यंत संरक्षण मिळू शकतं. असा दावा डॉ. हसन यांनी केला आहे. 50 मिलीपासून 5 लीटरपर्यंत सॅनिटायझर उपलब्ध आहे. जेल फॉर्ममध्येही हे सॅनिटायझर मिळत असल्याचं हसन यांनी सांगितलं. एएनआयशी बोलताना डॉ, हसन म्हणाले, "कंपनीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझर उप्तादित केले जात आहे. पैशाच्या नोटा, गाडीची चावी यांच्यासारख्या अनेक वस्तू वेगळ्या सॅनिटायझरने स्वच्छ करता येऊ शकता. याशिवाय रूम, बगीचा परिसर सॅनिटाइझ करण्यासाठी फॉगिंग मशीन्सही आहेत" हे वाचा - रुग्णालयात बेड उपलब्ध नाही; घरी येऊन डॉक्टर कोरोना रुग्णांवर करणार उपचार 14 मार्चला भारतात हँड सॅनिटायझर आणि फेस मास्क अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. याची मागणी आणि पुरवठा लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यानुसार लोकांसाठी आवश्यक असेल्या वस्तूंची किंमत आणि साठवणुकीवर केंद्र सरकारचं नियंत्रण असतं. मात्र सॅनिटायझर मास्क अत्यावश्यक वस्तूंमध्ये असल्याच्या नोटिफिकेशनमध्ये 30 जूनपर्यंतचा उल्लेख होता. त्यानंतर केंद्र सरकारने याची मुदत वाढवलेली नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Hand sanitizer, Health, Lifestyle, Pen, Sanitizer

    पुढील बातम्या