बहुतेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणं, सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र कोरोनाव्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांना मास्क घालणं बंधनकारक आहे. शिवाय मॉल, मोठी दुकानं, फूड मार्केटमध्ये जाण्याआधी शरीराचं तापमान तपासलं जातं. हे दृश्यं आहे ते इटलीतील. जिथं फूड मार्केटच्या प्रवेशद्वारावर लोकं विशिष्ट अंतर ठेवून उभे आहेत. प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून त्यांना आत सोडलं जातं. (फोटो - रॉयटर्स)
लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्ती दुरावल्या. कपल एकमेकांपासून दूर गेले, मित्रमैत्रिणी दूर झाले. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बहुतेकांनी सर्वात आधी आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींची भेट घेतली. स्पेनमधील एल्डरी केअर सेंटरमधील हे दृश्यं आहे. तब्बल 102 दिवसांनी या ठिकाणच्या वृद्धांना आपल्या प्रिय व्यक्तींना भेटता येतं आहे. या फोटोमध्ये पती-पत्नी एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. लग्नाच्या 59 वर्षांनंतर ते असे कधीच वेगळे झाले नव्हते. मात्र तशी वेळ आली आणि त्यांना वेगळं व्हावं लागलं. यानंतर ते भेटले मात्र त्यावेळीदेखील कोरोनाचा धोका नको म्हणून त्यांनी आवश्यक ती काळजी घेतली आहे. (फोटो - एपी)
लॉकडाऊनमध्ये आणखी एक समस्या होती ते म्हणजे वाढलेल्या दाढी-केसांचं काय करायचं? त्या परिस्थितीत अनेकांनी घरच्या घरीच आपल्या हातात कात्री घेऊन एक्सपिरेमेंट्स केलं. मात्र जसे सलून खुले झाले तेव्हा सर्वजण तिथे पळाले. मात्र सलूनमध्येही कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. हे पॅरिसमधील बार्बर शॉप आहे. जिथं बार्बरने मास्क घातला आहे त्याशिवाय चेहऱ्यावर प्रोटेक्टिव्ह शीटही लावली आहे आणि हातात ग्लोव्हज घातले आहेत. (फोटो - रॉयटर्स)