मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair tips | काळेभोर दाट सिल्की केस चारचौघीत मिरवायचेत? हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Hair tips | काळेभोर दाट सिल्की केस चारचौघीत मिरवायचेत? हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

प्रत्येक मुलीला आपले केस काळेभोर दाट आणि सिल्की असावे असे वाटतात. यासाठी बाजारात भेटणाऱ्या असंख्य प्रॉडक्टचा त्या वापर करतात. मात्र, यामुळे केस खराबही होऊ शकतात. आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही चारचौघीत काळेभोर दाट आणि सिल्की केस मिरवाल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 नोव्हेंबर : एकेकाळी काळेभोर दाट, लांबसडक केस (Long Hair) म्हणजे स्त्री सौंदर्याचा एक महत्त्वाचा मापदंड मानला जात असे. अलीकडच्या काळात त्यात खूप बदल झाला आहे. आजकाल लांब केस असणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमी झालेलं दिसतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लांब केसांची खूप काळजी घ्यावी लागते. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात ते प्रत्येक स्त्रीला शक्य होईल, असं नाही. त्यामुळे आजकाल वेगवेगळे हेअरकट असलेल्या मुली, महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

अर्थात केस लहान असले तरी ते छान दिसावेत, सुळसुळीत असावेत यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते. यासाठी बाजारात नानाविध प्रकारची साधनं, उत्पादनं उपलब्ध आहेत. अनेक मुली, महिला आपले केस अगदी सुळसुळीत म्हणजे सिल्की असावेत यासाठी वेगवगळी उत्पादनं वापरतात. काही वेळा त्याचा विपरीत परिणामही होतो. त्यामुळे अशी बाजारातली उत्पादनं टाळून घरच्या घरी काही उपाय करणं सहज शक्य आहे. त्याबाबत काही माहिती देत आहोत.

केस लांब असोत की लहान, त्यात अनेकदा गुंता होतो. हा गुंता सोडवणं अतिशय कठीण असतं. केस सिल्की असल्यास फार गुंता होत नाही. केसांत गुंता होऊ नये यासाठी घरीच अगदी सहज उपलब्ध असलेल्या घटकांच्या मदतीने हेअर डिटँगलिंग स्प्रे घरीच बनवता येतो. या हेअर डिटँगलिंग स्प्रेच्या साह्याने केसांत गुंता होणं टाळता येईल. ओले केस विंचरण्यापूर्वी एक डिटँगलिंग स्प्रे (Detangling Spray) वापरावा.

Hair Dye करताना एक छोटीशी चूक पडली महागात; सलूननंतर थेट गाठावं

दोन-तीन प्रकारचे डिटँगलिंग स्प्रे बनवता येतात. प्रथम आपण कोरफड अर्थात अॅलो व्हेरा डिटँगलिंग स्प्रे (Aloe Vera Gel Detangling Spray) कसा बनवायचा ते पाहू या.

काहीवेळा आपल्या वाईट सवयींमुळे केस गळायला लागतात.

काहीवेळा आपल्या वाईट सवयींमुळे केस गळायला लागतात.

अॅलो व्हेरा डिटँगलिंग स्प्रे बनवण्यासाठी 1 चमचा अॅलो व्हेरा जेल (Aloevera Gel), एक चमचा आर्गन किंवा जोजोबा तेल (Jojoba Oil), डिस्टिल्ड वॉटर, इसेन्शियल ऑइल यांची आवश्यकता आहे. अॅलो व्हेरा जेलमध्ये जोजोबा तेल आणि इसेन्शियल ऑइलचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण एका बाटलीत ओता आणि मग त्यात डिस्टिल्ड वॉटर भरा. पाण्याचं प्रमाण तुम्हाला स्प्रे किती पातळ हवा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. हे मिश्रण चांगलं मिसळा. तुमचा स्प्रे तयार आहे. आता केस विंचरण्यापूर्वी हा स्प्रे वापरा. तुम्हाला केसातल्या गुंत्याचा अजिबात त्रास होणार नाही. तुमचे केस अगदी चमकदार आणि सिल्की होतील.

बापरे! Hair Transplant साठी संजय जाधवनं खर्च केले इतके लाख

जोजोबा ऑइल डिटँगलिंग स्प्रे

जोजोबा ऑइलच्‍या मदतीनेही एक उत्‍कृष्‍ट डिटँगलिंग स्प्रे बनवू शकता. यासाठी एक कप अॅपल सायडर व्हिनेगार, 1 कप पाणी, 1 टीस्पून जोजोबा तेल आणि इसेन्शियल ऑइलचे काही थेंब याची गरज असते. आता सर्वांत आधी अॅपल सायडर व्हिनेगारमध्ये इसेन्शियल ऑइलचे काही थेंब मिसळावेत. काही वेळ हे मिश्रण तसंच ठेवावं. त्यानंतर काही वेळाने या मिश्रणात जोजोबा ऑइल मिसळा आणि सगळं मिश्रण नीट ढवळून घ्यावं. आता त्यात थोडं पाणी घालावं आणि सगळं नीट एकत्र करावं. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.

घरी उपलब्ध असलेल्या हेअर कंडिशनरचा (Hair Conditioner) वापर करूनही तुम्ही उत्‍कृष्‍ट डिटँगलिंग स्प्रे बनवू शकता. याकरिता 2-3 चमचे कंडिशनर, 1 कप गरम पाणी, इसेन्शियल ऑइलचे काही थेंब या साहित्याची गरज असते. हा स्प्रे बनवण्यासाठी प्रथम एक स्प्रेची रिकामी बाटली घ्या आणि त्यात हेअर कंडिशनर घाला. नंतर त्यात कोमट पाणी घालावं. ते नीट मिसळल्यानंतर त्यात इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घालावेत. हे मिश्रण नीट ढवळून घ्यावं. तुमचा डिटँगलिंग स्प्रे तयार असेल. ओलसर केसांवर लिव्ह-इन-कंडिशनर म्हणून देखील हा स्प्रे लावू शकता. केस सुकल्यानंतर हा स्प्रे लावला, तर केस विंचरताना कोणतीही अडचण येणार नाही.

First published:

Tags: Woman hair, Women, Women hairstyles