मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Hair Fall : पुरुषांनो सावधान! ‘या’ गोष्टींचं सेवन कराल तर होईल टक्कल, वेळीच व्हा सावध

Hair Fall : पुरुषांनो सावधान! ‘या’ गोष्टींचं सेवन कराल तर होईल टक्कल, वेळीच व्हा सावध

पुरुषांनो सावधान! ‘या’ पेय प्याल तर होईल टक्कल, वेळीच व्हा सावध

पुरुषांनो सावधान! ‘या’ पेय प्याल तर होईल टक्कल, वेळीच व्हा सावध

Hair Fall problem : नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. जे पुरुष नियमित एनर्जी ड्रिंक घेतात, अशा पुरुषांमध्ये केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांना अकाली टक्कल पडतं असं या संशोधनातून दिसून आलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 जानेवारी : अलीकडे अनेक पुरुषांना कमी वयातच केस गळणं, पांढरे होणं, पातळ होणं, टक्कल पडणं यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. केसांशी संबंधित समस्यांमागे अनेक कारणं असतात. वयापरत्वे केसांशी संबंधित समस्या जाणवणं हे सर्वसामान्य मानलं जातं; पण कमी वयातच अशा समस्या निर्माण झाल्या तर त्याचा परिणाम निश्चितच पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. या संदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. जे पुरुष नियमित एनर्जी ड्रिंक घेतात, अशा पुरुषांमध्ये केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांना अकाली टक्कल पडतं असं या संशोधनातून दिसून आलं आहे.

  वाढत्या वयामुळे शरीरात अनेक बदल होत असतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं, केस गळणं किंवा पांढरे होणं हे वय वाढल्याचे संकेत मानले जातात. काही पुरुषांमध्ये अकाली केस गळणं, पांढरे होणं किंवा टक्कल पडण्याची समस्या दिसून येते. केसांचा थेट संबंध व्यक्तिमत्त्वाशी असतो. त्यामुळे या समस्येचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. यावर करण्यात आलेल्या संशोधनातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. जे पुरुष नियमितपणे एनर्जी ड्रिंक्स घेतात, त्यांचे केस लवकर गळतात असं या निष्कर्षात दिसून आलं आहे.

  `द सन`च्या माहितीनुसार, पुरुषांना एनर्जी ड्रिंक्स खूप आवडतात. नियमितपणे एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो. फिजी ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि जास्त गोड चहा, कॉफी पिणाऱ्यांनाही केस गळण्याचा धोका जास्त असतो, असं संशोधनात दिसून आलं आहे.

  चीनची राजधानी बीजिंगमधल्या सिंघुआ युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. संशोधनादरम्यान, संशोधकांनी 18 ते 45 वयोगटातल्या 1000पेक्षा जास्त चिनी पुरुषांच्या खाण्याच्या सवयींचा चार महिने अभ्यास केला. यादरम्यान, त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयी, तसंच त्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित माहितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं.

  हेही वाचा: Hair Care Tips : केस घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी अशा प्रकारे वापरा सी सॉल्ट, वाचा फायदे

  या संशोधनादरम्यान फिजी ड्रिंक्स (कोक, पेप्सीसारखे सॉफ्ट कार्बोनेटेड ड्रिंक्स) आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स (इलेक्ट्रोलाइटयुक्त ड्रिंक्स म्हणजेच अशी पेयं, जी खेळाडू एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी पाण्याऐवजी पितात) प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असतो.

  या संशोधनात सहभागी झालेले पुरुष नियमितपणे दर आठवड्याला एक ते तीन लिटर या प्रमाणात ही पेयं पीत होते आणि केस गळण्याच्या समस्येला बळी पडत होते, असा दावा जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती अशा ड्रिंक्सना स्पर्शही करत नाहीत अशांच्या तुलनेत ज्या व्यक्ती रोज एकापेक्षा जास्त वेळा साखरयुक्त ड्रिंक्स घेतात, त्यांच्यात केस गळण्याची शक्यता 42 टक्के जास्त असल्याचं दिसून आलं. संशोधनात सहभागी असलेल्या ज्या पुरुषांना केस गळतीची समस्या आहे, त्यांनी आठवड्यातून सरासरी 12 वेळा साखरयुक्त पेय घेतल्याचं कबूल केलं.

  या संशोधनात केवळ ड्रिंक्सचं मूल्यांकन केलं गेलं नाही, तर पुरुषांच्या आहाराशी निगडित सवयीदेखील विचारात घेतल्या गेल्या. जे पुरुष रोजच्या आहारात भाज्या कमी प्रमाणात सेवन करतात आणि फास्ट फूड जास्त खातात त्यांना केस गळतीची समस्या अधिक असल्याचं संशोधनात दिसून आलं. याशिवाय केसांच्या समस्येला चिंता कारणीभूत असल्याचंदेखील संशोधनात दिसून आलं. जे पुरुष चिंता जास्त करतात, त्यांनाही केसांशी निगडित समस्यांचा धोका असतो, असंही संशोधनात दिसून आलं. केस मजबूत आणि सुंदर दिसावेत यासाठी हेल्दी डाएट आवश्यक असल्याचं यापूर्वीच्या अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे.

  लंडनचे त्वचा तज्ज्ञ डॉ. शेरॉन वोंग यांनी `द सन`शी बोलताना सांगितलं, `हेअर फॉलिकल पेशी शरीरातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या जलद विभाजन होणाऱ्या पेशी आहेत. त्यांना पोषक आणि समतोल आहार गरजेचा असतो. यात लीन प्रोटीन (कमी फॅट्स, कार्ब्स आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ), हेल्दी कार्ब्ज, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन आणि खनिजांचा समावेश आहे; पण केसांसाठी कोणतंही सुपरफूड नाही हे ध्यानात घ्यावं. केस हा मानवी शरीराचा जगण्यासाठी अत्यावश्यक भाग नसल्याने, शरीर केसांच्या वाढीसाठी पोषक तत्त्वांचा वापर करण्यास प्राधान्य देत नाही. त्यामुळे केसांचं उत्तम पोषण होण्यासाठी तुम्ही नियमितपणे हेल्दी डाएट घेतला पाहिजे. पोषक तत्त्वांची कमतरता हे केस पातळ होण्यामागचं आणि गळण्यामागचं एक सामान्य कारण आहे,` असं वोंग यांनी स्पष्ट केलं.

  First published:

  Tags: Health Tips