मुंबई, 27 जानेवारी : समुद्री मीठाचा वापर आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हे केसांमधील व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आणि तेलकट केस असलेले टाळू स्वच्छ करण्यासाठीदेखील कार्य करते आणि त्याच वेळी केसांचा पोत सहज सुधारू शकतो. समुद्री मीठामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे कोंडा दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. यामध्ये ऑस्मोसिस नावाचे तत्व असते जे फंगलची समस्या दूर करते.
lovebycurl नुसार, समुद्री मीठ म्हणजेच सी सॉल्ट आपल्या केसांवर त्याच्या पोत, जाडी किंवा कुरळेपणावर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारे काम करते. उदाहरणार्थ कोरड्या केसांना ते आणखी कोरडे बनवू शकते. परंतु या मीठात असे अनेक गुणधर्म आहेत जे केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी मदत करतात.
Hair Care Tips : केस रुक्ष आणि निस्तेज झालेत? या व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते कारण
केसांसाठी सी सॉल्ट किती फायदेशीर?
कोंडा घालवण्यासाठी फायदेशीर
सी सॉल्टमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात. केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. वास्तविक यामध्ये ऑस्मोसिस नावाचे तत्व असते. जे फंगलची समस्या दूर करते. हे एक चांगले एक्सफोलिएटर आहे जे टाळूतील कोंडा मुक्त करते. तुम्ही केसांच्या मुळांमध्ये दोन चमचे मीठ टाका आणि केसांना मसाज केल्यानंतर धुवा.
केसांची होते वाढ
सी सॉल्टच्या वापराने रक्ताभिसरण सुधारते आणि टाळूला होणारा रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. इतकेच नाही तर यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम असते ज्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते.
तेलकट टाळूची समस्या दूर करते
तेलकट केसांची समस्या आजकाल सामान्य आहे. त्यामुळे केसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे केस सामान्य बनवायचे असतील तर तुमच्या हेयर केयर रुटीनमध्ये सी सॉल्टचा समावेश करा. यासाठी तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये एक ते दोन चमचे मीठ घालून केसांच्या टाळूवर मसाज करा. नंतर सामान्य पाण्याने धुवा.
केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल
केस घनदाट करते
सी सॉल्ट तुमच्या केसांचा पोत जाड बनवते आणि केसांना व्हॉल्यूम आणते म्हणजेच तुमचे केस दाट दिसतात. मात्र त्याचा जास्त वापर केल्याने केस डिहायड्रेटेड किंवा कोरडेदेखील होऊ शकतात. त्यामुळे याचा वापर जास्त प्रमाणात करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health, Home remedies, Lifestyle