जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Hair Care : फक्त गरमच नाही थंड पाण्यानेही होऊ शकते केसांचे नुकसान, पाहा काय आहे उपाय

Hair Care : फक्त गरमच नाही थंड पाण्यानेही होऊ शकते केसांचे नुकसान, पाहा काय आहे उपाय

केस थंड पाण्याने धुवावेत की गरम पाण्याने?

केस थंड पाण्याने धुवावेत की गरम पाण्याने?

केसांची काळजी घेण्यासाठी अनेकजण नियमित पार्लरला जातात, महागडे हेअर प्रोडक्टस वापरतात. मात्र काहीवेळ आपल्या साध्या साध्या सवयी केसांचे आरोग्य बिघडवतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जून : आपले केस सुंदर, मजबूत आणि मऊ असावे असे प्रत्येकीला वाटते. विशेषतः महिलांमध्ये केसांची काळजी जरा जास्त असते. म्हणून त्या केसांसाठी खूप जागरूक आणि तत्पर असतात. केसांची काळजी घेण्यासाठी अनेकजण नियमित पार्लरला जातात, महागडे हेअर प्रोडक्टस वापरतात. मात्र काहीवेळ आपल्या साध्या साध्या सवयी केसांचे आरोग्य बिघडवतात. यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान. केस धुण्यासाठी गरम आणि थंड दोन्ही पाण्याचा वापर करण्याचे फायदे आणि तोटे आहेत. कारण पाण्याच्या तापमानाचा केसांच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया थंड किंवा गरम पाण्याचे केस धुण्याचे काय फायदे आहेत आणि त्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते. एबीपी माझ्यामध्ये याबद्दल सविस्तर वृत्त दिले गेले आहे.

Cooking Oil : एकदा वापरलेले तेल वारंवार वापरणे असते घातक! पाहा किती वेळा वापरणे असते सुरक्षित

गरम पाण्याचे फायदे - गरम पाण्याने केस धुतल्याने त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्वचेला जास्त ऑक्सिजन मिळतो. - गरम पाण्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले रक्ताभिसरणही गतिमान होते. - गरम पाणी केसांच्या मुळांमध्ये साचलेले तेल, घाण आणि घाम साफ करण्याचे काम करते. - गरम पाणी केसांच्या क्युटिकल्स उघडून केसांमध्ये आर्द्रता आणते, ज्यामुळे केसांची चमक वाढते.

News18लोकमत
News18लोकमत

गरम पाण्याने होणारे नुकसान हिवाळ्यात गरम पाण्याने शॅम्पू केल्याने केस कोरडे होतात आणि त्यांची चमक जाते. केसांचा कोरडेपणा टाळण्यासाठी शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावावे आणि केस धुतल्यानंतर कंडिशनर नक्की वापरावे. थंड पाण्याचे फायदे - थंड पाण्याने केस धुतल्याने केसांची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे केसांचा ओलावा बाहेर जात नाही आणि केस कोरडे होत नाहीत. - थंड पाणी केसांना पोषक तत्व पुरवते. - थंड पाण्याचा वापर करून केसांच्या मुळांपासून अतिरिक्त आणि मृत पेशी काढल्या जातात. - थंड पाण्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहाते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. थंड पाण्याने होणारे नुकसान - थंड पाणी वापरल्याने ज्यांचे केस पातळ आहेत त्यांचे केस कमी आणि अस्वस्थ दिसतात. - थंड पाण्याचा वापर केल्याने हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढू शकते. - उन्हाळ्यातही थंड पाण्याने केस धुणे चांगले नाही.

Morning Routine : रोज सकाळी करा ही सोपी कामं, आयुष्यात नेहमी व्हाल यशस्वी आणि राहाल निरोगी!

केस धुण्यासाठी असे पाणी आहे योग्य त्यामुळे केस धुण्यासाठी कोणत्याही ऋतूमध्ये कोमट पाण्याचा वापर करणे योग्य आहे. यामुळे केसांमधील घाण आणि तेल निघून जाईल आणि त्वचेची छिद्रे उघडतील. तसेच केसांचे जास्त नुकसान होणार नाही. केस धुतल्यानंतर कंडिशन नक्की करावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात