नवी दिल्ली, 20 मार्च : दरवर्षी आजच्या दिवशी (20 मार्च) ‘जागतिक आनंद दिवस 2022’ साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक आनंद दिनाची ‘थीम शांत राहा, ज्ञानी व्हा आणि दयाळू राहा (Keep Calm, Stay Wise and Be Kind) अशी असल्यानं लोकांना आनंदी राहण्याची प्रेरणा मिळेल. आनंदी राहणे (Happiness Benefits) अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जे लोक दिवसभर दुःखी, चिंताग्रस्त, तणावात असतात, त्यांना लवकरच इतर अनेक आरोग्य समस्याही होऊ लागतात. परंतु जर तुम्ही आनंदी राहिलात, आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगलात, तर तुमचे आयुष्य आपोआप वाढते. आनंदी राहिल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. आनंदी राहिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. हृदयाचे कार्यही चांगले होते. आनंदी राहिल्याने तणाव कमी होऊ शकतो. हृदयविकाराचा धोका, इतर रोग किंवा शस्त्रक्रियातून जलद बरे होण्यास मदत मिळते. अनेक संशोधनांमध्ये असेही म्हटले गेले आहे की, आनंदी राहिल्यानं वय वाढतं. जाणून घेऊया, आनंदी राहण्याचे इतर कोणते आरोग्य फायदे (World Happiness Day 2022) आहेत. आनंदी राहण्याचे फायदे पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अनेक अभ्यासात असं आढळून आलं आहे की आनंदी राहिल्यानं हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका 13-26 टक्क्यांनी कमी होतो. जर तुम्हाला तुमचे हृदय दीर्घ आयुष्यासाठी धडधडायचे असेल तर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही अति-तणावग्रस्त असता, तेव्हा तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी लक्षणीय वाढते. या हार्मोनमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे लोक आनंदी असतात त्यांच्या रक्तातील कॉर्टिसोलची पातळी सातत्याने कमी असते. संशोधनातून असं समोर आलंय की, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती मजबूत असते, ज्यामुळे आपण निरोगी जीवन जगू शकता. यासोबतच संसर्ग किंवा रोगाशी लढण्याची शारीरिक क्षमताही वाढते. हे वाचा - आयुष्याचं वाटोळं व्हायला या 3 गोष्टीसुद्धा पुरेशा; वेळ गेल्यानंतर अनेकांना कळतं आजकाल बहुतेक लोक चुकीची जीवनशैली जगत आहेत, परंतु जे लोक निरोगी खातात, व्यायाम करतात, पुरेशी झोप घेतात, ते मानसिकदृष्ट्या आनंदी राहतात. एकूणच आरोग्याविषयी चांगली समज त्यांच्यात निर्माण होते. हे वाचा - या फळं-भाज्यांच्या बिया कधीही फेकू नयेत; गंभीर आजारांवर आहेत गुणकारी आनंदी राहिल्याने शारीरिक वेदना, मानसिक ताण, चिंता, नैराश्य कमी होते. ज्यांना हृदयविकारापासून नेहमी दूर राहायचे आहे, त्यांनी आनंदी राहायला हवे, कारण तुम्ही जेवढे आनंदी, सकारात्मक असाल, तेवढे हृदयाचे नुकसान होणार नाही. त्यामुळे उच्च रक्तदाबही कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.