मुंबई, 29 सप्टेंबर : केस (Hair) हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. विशेषतः महिलांसाठी (woman) तर खासच. आपले केस दाट, काळेभोर आणि मजबूत (Strong hair) असावेत असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे प्रत्येक जण केसांची काळजी घेत असतो. अनेकांना केस गळण्याची समस्या सतत भेडसावत असते. त्यामुळे केस गळू नयेत, लांब, चमकदार (Long hair) व्हावेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तेल (Hair Oils) वापरले जातात. शाम्पू (Shampoo) आणि अन्य विविध प्रसाधनं वापरली जातात. केसांचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी केसांची निगा (Hair Care) राखताना काही गोष्टींची अगदी बारकाईने काळजी घेणंही आवश्यक असतं. त्यापैकीच एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे केस विंचरणं (Hair combing).
केस व्यवस्थित विंचरल्यानं (Hair Comb) केस मजबूत राहतात. टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांची मुळं मजबूत होतात. परिणामी केस गळत (Hair fall) नाहीत.
यामुळे दिवसातून दोन वेळा तरी केस (Daily Twice Comb Hair) जरूर विंचरावेत; मात्र केस विंचरताना काही गोष्टींचं भान बाळगणं आवश्यक आहे. पण केस विंचरण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत असते.
कोणत्या वेळी विंचरावेत केस?
साधारणपणे कोणत्याही दोन वेळी केस विंचरणं योग्य असते. केस धुण्यापूर्वी ते जरूर विंचरावेत. त्यामुळे ते तुटत नाहीत आणि चांगले स्वच्छ होतात. शाम्पू लावताना गुंता होत नाही.
हे वाचा - बापरे! चिमुकलीच्या पापण्या, डोक्यावरील केस गायब; कोरोना लॉकडाऊनचा भयंकर परिणाम
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे केस ओले (Wet) असताना विंचरू नयेत. कारण यामुळे केसांचं खूप नुकसान होतं. ओले केस विंचरल्यानं मुळं कमकुवत होतात आणि केस लवकर गळतात. केस कुरळे असतील तर ही समस्या आणखीच वाढते.
त्यामुळे केस धुतल्यानंतर किंवा केसांमध्ये खूप घाम आला असेल तर ते विंचरू नका. केस पूर्णपणे कोरडे (Dry) केल्यानंतरच विंचरा.
केस विंचरण्याची योग्य पद्धत
केसांची निगा घेताना चांगला कंगवा (Comb) वापरावा. मोठ्या दातांचा कंगवा वापरणं उत्तम. यामुळे केस तुटत नाहीत आणि केसातला गुंता सोडवणंही सोपं होतं.
हे वाचा - लाडक्या कुत्र्याच्या केसांपासून बनवला स्कार्फ, महिलेनं खर्च केले 18 हजार!
केस विंचरण्याची सर्वांत योग्य पद्धत म्हणजे नेहमी केस दोन किंवा चार भागांमध्ये विभागून घ्या आणि मग ते विंचरण्यास सुरू करा. वरपासून थेट शेवटपर्यंत कंगवा न्या. केसांच्या मुळांशी नीट विंचरा. अशा प्रकारे योग्य कंगवा वापरून योग्य पद्धतीनं केस विंचरल्यास तुमच्या केसांचं कसलंही नुकसान होणार नाही. त्यांचं आरोग्य सुधारेल आणि ते मजबूत आणि चमकदार होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Lifestyle, Woman hair