मुंबई, 27 जून : पावसात चिंब भिजायला आणि मनसोक्त आनंद लुटायला सगळ्यांना आवडतं. पण या पावसाचा आनंद घेताना केसांची काळजीही घेणं महत्त्वाचं आहे. खरं तर पावसाळा हा ऋतु (Mansion) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. पावसाळी पर्यटनासाठी आपण जात असतो. तिथे जाऊन आपण मनसोक्त भिजतोही; पण या वेळी केसांची आणि त्वचेची काळजी घेणंदेखील महत्त्वाचं ठरतं. पावसात केस खराब (Hair Fall) होण्याची शक्यता जास्त असते.पावसात भिजल्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे केस गळण्याची समस्या सुरू होते. पावसाळ्यात काही खबरदारी घेतल्यास केस गळतीची समस्या सहज टाळता येऊ शकते.
या ऋतूत कमीतकमी हेअर प्रॉडक्ट्स (Hair Products) वापरा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात केसांच्या होणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबत जाणून घेऊया. केस गळणंदेखील त्यापैकी एक आहे. पावसाळ्यात केस गळण्याची समस्या सामान्य आहे.
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही खास टिप्स शेअर करणार आहोत. ज्यामुळे केसगळतीपासून तुमची काही प्रमाणात सुटका होऊ शकते.
- केस लांब नको
पावसाळ्यात केस वाढवू नयेत कारण पावसात पावसात भिजल्याने केस अधिक प्रमाणात गळू शकतात. शिवाय पाणी मुरून सर्दी खोकल्यासारखे आजारी संभवतात. त्यामुळे पावसाळ्यात केसांची लांबी कमी करून घ्या.
- टोपी, स्कार्फ वापरा
पावसाळ्यात केस झाकणं गरजेचं असतं. घराबाहेर पडताना केस नेहमी स्कार्फ किंवा टोपीने झाकून ठेवावेत. ज्यामुळे केस ओलसर होत नाहीत आणि त्यांत हवेतील धूळ अडकत नाही.
- केस धुणं आवश्यक आहे
पावसाळ्यात अनेकदा केस ओले होतात. अशा परिस्थितीत बहुतेक जण ओले केस वाळवून बांधतात, त्यामुळे केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्यात केस भिजल्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा आणि वाळल्यानंतरच केस बांधा.
Grow Hair Faster: केसांच्या चांगल्या वाढीसाठी या 3 गोष्टी आहेत खास
- कोरडा शॅम्पू वापरा
पावसाळ्यात केस ओले झाले की सर्वप्रथम ओल्या केसांना पेपर टॉवेलने दाबून पाणी काढून टाका. आता टाळू वगळता केसांच्या सर्व भागांवर ड्राय शॅम्पु स्प्रे Dry shampoo Sprey) करा आणि केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
- चहा आणि कॉफीचं सेवन कमी करा
पावसाळ्यात केसांचं पोषण करण्यासाठी तेलावर आधारित सिरम वापरणं चांगलं. या शिवाय दर 15 दिवसांनी केसांचं डीप कंडिशनिंग करा. तसंच, पावसाळ्यात चहा आणि कॉफी यांसारख्या कॅफिनयुक्त पेयांचं सेवन कमीतकमी करा.
- सकस आहारावर भर द्या
पावसाळ्यात केसगळती कमी करण्यासाठी केसांबरोबर सकस आहाराकडे लक्ष देण्यास विसरू नका. तळलेलं आणि जंक फूड खाणं टाळण्याचा प्रयत्न करा. हे पदार्थ खाल्ल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल.
या टिप्स पावसाळ्यात केसगळती थांबवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, तरीही याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Woman hair, Women hairstyles