जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' छोट्या बदलांकडे कधीच करू नये दुर्लक्ष, असतात गंभीर आजाराचे संकेत

महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' छोट्या बदलांकडे कधीच करू नये दुर्लक्ष, असतात गंभीर आजाराचे संकेत

महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' छोट्या बदलांकडे कधीच करू नये दुर्लक्ष, असतात गंभीर आजाराचे संकेत

गायनॅकॉलॉजिस्ट (Gynaecologist) डॉ. निशा कपूर (Dr. Nisha Kapoor) यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा-जेव्हा आपलं शरीर कमकुवत होतं किंवा आपल्याला अशक्तपणा (Weakness) जाणवतो तेव्हा आपल्या शरीरात काहीतरी गंभीर बदल झालेले असतात

    नवी दिल्ली 17 मे : कुटुंब व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सर्वांत मोठी जबाबदारी स्त्रिया (Women) पार पाडतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानालहान गोष्टींची काळजी स्त्रिया घेतात. मात्र, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे (Women Health) सर्रास दुर्लक्ष करतात. भारतामध्ये तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. मात्र, सातत्यानं स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास नंतर त्याचे गंभीर परिणाम (Serious Consequences) भोगावे लागू शकतात. गायनॅकॉलॉजिस्ट (Gynecologists’) डॉ. निशा कपूर (Dr. Nisha Kapoor) यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा-जेव्हा आपलं शरीर कमकुवत होतं किंवा आपल्याला अशक्तपणा (Weakness) जाणवतो तेव्हा आपल्या शरीरात काहीतरी गंभीर बदल झालेले असतात. असे बदल म्हणजे काही आजारांची लक्षणं (Illness Symptoms) असतात. आपण ती वेळीच ओळखून त्यावर लवकरात लवकर उपचार (Treatment) करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ते बदल आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. हे सगळं पुरूष-स्री दोघांनाही लागू असलं तरीही महिला त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. टाइम्स बुलनं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. Eyes Care Tips: वारंवार पापण्यांना खाज सुटत असेल तर दुर्लक्ष नको; जाणून घ्या कारणे आणि उपाय कोणत्याही महिलेला स्वत:च्या शरीरामध्ये खालील बदल जाणवत असतील तर त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. 1) केस गळती - जर तुमचे केस सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात गळत (Hairfall) असतील तर तुम्ही एकदा थायरॉईडची (Thyroid) टेस्ट केली पाहिजे. कारण, जास्त केसगळती हे थायरॉईडचं लक्षण आहे. वेळीच त्याचं निदान झालं तर त्यावर उपचार घेणं शक्य होतं. 2) डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स येणं - जर तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं (Dark Circles) बरी होत नसतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. एखाद्या प्रकारची अ‌ॅलर्जी (Allergies) किंवा रक्ताची कमतरता असल्यास डार्क सर्कल्सची समस्या उद्भवत असते. 3) नखं पातळं होणं - जर तुमच्या बोटांची नखं पातळ झाली असतील आणि आपोआप तुटत असतील तर हे कॅल्शिअमच्या (Calcium) कमतरतेचं लक्षणं आहे. याशिवाय, शरीरामध्ये जर व्हिटॅमिन डी (Vitamin D) किंवा झिंकचं (Zinc) प्रमाण कमी असलं तरी ही समस्या उद्भवते. 4) जास्त थकवा येणं - सध्याच्या बिझी शेड्युलमुळे कोणालाही थकवा जाणवतो. मात्र, जर असं वारंवार घडत असेल तर एकदा कंप्लिट ब्लड काउंट टेस्ट (Complete Blood Count Test) करून घेतली पाहिजे. काय सांगता! सातत्यानं डोकेदुखीचा त्रास होण्यामागं असू शकतात ‘इतकी’ कारणं 5) डोळे लाल होणं आणि चक्कर येणं - जर तुमचे डोळे फारच लाल होत असतील आणि त्यासोबत तुम्हाला चक्करही येत असेल तर तुम्ही ब्लड प्रेशर (Blood Pressure) चेक केलं पाहिजे. डोळे लाल होऊन चक्कर येणं, हे ब्लड प्रेशर सुरळीत नसल्याचं लक्षण आहे. 6) वारंवार लघवी येणं - जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी करण्याची भावना होत असेल तर हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं (Urinary Tract Infections) लक्षण असू शकतं. म्हणून लघवीला जाण्याचं प्रमाण वाढलं असेल तर युरिन कल्चर टेस्ट (Urine Culture Test) करून घ्यावी. 7) भुवया विरळ होणं - जर तुमच्या दाट भुवया दिवसेंदिवस पातळ होत असतील आणि त्यांची वाढ होत नसेल, तर तुम्हाला हॉर्मोन्ससंबंधित त्रास असू शकतो. त्यामुळे तुम्ही हॉर्मोन टेस्ट (Hormone Test) करून घ्यावी. ही लक्षणं नसतील पण नेहमीपेक्षा कुठल्याही आजाराचा नेहमी सहन करण्याच्या क्षमतेपलीकडे त्रास होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही श्रेयस्कर आहे. त्यामुळे वेळीच निदान होतं आणि काही झालं नसेल तर मन निश्चिंत होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात