मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दारु पिण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, 17 तासांत 67 पब्जमध्ये मद्यपान, ठरला जागतिक विक्रम

दारु पिण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, 17 तासांत 67 पब्जमध्ये मद्यपान, ठरला जागतिक विक्रम

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ही गोष्ट चक्रावून टाकणारी आहे. नॅथन क्रॅम्प या 22 वर्षीय ब्रिटिश व्यक्तीने 24 तासांत एकंदर 67 विविध पब्जमध्ये जाऊन मद्यपान केलं. त्याने केवळ 17 तासांत ही बाब पूर्ण केली.

जगात चित्रविचित्र माणसांची कमतरता नाही. अशी माणसं आपल्या विचित्र कृत्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अर्थातच, वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) करण्यासाठी अशी विचित्र माणसं काहीही करू शकतात. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने एक विचित्र वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. या व्यक्तीने 17 तासांत 67 पब्जमध्ये जाऊन दारू पिण्याचा विक्रम केला आहे. एका पबपासून दुसर्‍या पबपर्यंतचं अंतर त्याने धावत पार केल्याचं समजतंय. ही गोष्ट चक्रावून टाकणारी आहे. नॅथन क्रॅम्प या 22 वर्षीय ब्रिटिश व्यक्तीने 24 तासांत एकंदर 67 विविध पब्जमध्ये जाऊन मद्यपान केलं. त्याने केवळ 17 तासांत ही बाब पूर्ण केली. आता नॅथनच्या नावाचं वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये (Guinness Book of World Record) नोंदवला गेला आहे. त्याच्यासमोर 24 तासांत 67 पब्जमध्ये जाऊन दारू पिण्याचं आव्हान होतं. त्याने ते अवघ्या 17 तासांत पूर्ण केलं. रेकॉर्ड करण्यासाठी केली धावपळ नॅथन क्रॅम्पला 17 तासांत 67 पब्जमध्ये जाऊन दारू पिण्याचा विक्रम करण्यासाठी धावपळ करावी लागली असणार हे उघडच आहे. त्याचे मित्रदेखील या विक्रमाचे साक्षीदार आहेत. नॅथन म्हणाला, “हे निश्चितच सोपं काम नव्हतं.” लिव्हरपूल इकोशी बोलताना त्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या 25 पब्जमध्ये त्याने सोबर ड्रिंक घेतलं. पुढच्या 15 पब्जमध्ये त्या सोबर ड्रिंक्समध्ये अल्कोहोल मिसळलं. नॅथन हे काम करताना एक अल्कोहोलिक (Alcoholic Drink) आणि एक नॉन-अल्कोहोलिक (Non-Alcoholic Drink) अशा पद्धतीने ड्रिंक घेत होता. प्रत्येक ठिकाणी त्याला काही ना काही पिणं गरजेचं होतं. पुराव्यादाखल स्वाक्षरी आणि रिसीट घेणंही आवश्यक होतं. यापूर्वी हा विक्रम गेरेथ मर्फी या व्यक्तीच्या नावावर होता. गेरेथने 17 तासांत कॅड्रिफमधल्या 56 पब्जमध्ये मद्यपान करण्याचा विक्रम केला होता. ('ऑनस्क्रिन सोशिक असल्या तरी प्रत्यक्ष मात्र...'; मिलिंद गवळींनी केला अलका ताईंबाबत मोठा खुलासा) असंही एक अजब रेकॉर्ड इंग्लंडमधल्या केंब्रिजशायर इथल्या सेंट नियोट्समध्ये राहणार्‍या मॅट एलिसनेही एक जागतिक विक्रम केला होता. या मॅट एलिसने गेल्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी 9 तासांत 51 पब्जमध्ये जाऊन मद्यपान केलं होतं. प्रत्येक ठिकाणी मॅटने 125 मिलीलीटर इतकं ड्रिंक घेतलं. तसंच प्रत्येक ड्रिंक संपवायला मॅटला सरासरी 4 मिनिटं लागली होती. जगावेगळं काही तरी करावं असं अनेकांनाच वाटत असतं; पण नॅथनने, तसंच मॅटनेही केलेला जागतिक विक्रम अजब असाच आहे.
First published:

Tags: Liquor stock, World record

पुढील बातम्या