नवी दिल्ली : तुम्ही जर ऑनलाईन औषधं मागवत असाल तर ती मागवताना विशेष काळजी घ्या, अन्यथा खूप मोठं नुकसान होऊ शकतं. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या कंपनीचीच औषधं घ्या, दुसऱ्या कंपन्यांची औषधं घेण्याच्या नादात आपल्या जीवाशी खेळ होऊ शकतो. याचं कारण म्हणजे आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 18 फार्मा कंपन्यांवर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. 18 फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या औषधांमध्ये त्रुटी आढलल्या काही औषधांच्या क्वालिटीबाबत संशय निर्माण झाल्याने तपासणी करून परवाने रद्द करण्यात आले आहेत. या 18 कंपन्या वेगवेगळ्या राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 76 औषध कंपन्यांची तपासणी केली होती. यापैकी 17 कंपनीत बनवलेली औषधे दर्जेदार नसल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या 17 कंपन्यांना औषधांचे उत्पादन तातडीने बंद करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
अंघोळ केली की दूर होतात आजार, अनोखा तलावाबाबत “अशी” आहे मान्यता!Government of India cancels licenses of 18 pharma companies for manufacturing of spurious medicines following inspection by Drugs Controller General of India (DCGI) on 76 companies across 20 States: Official sources
— ANI (@ANI) March 28, 2023
बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांविरोधात अनेक दिवसांपासून मोहीम सुरू आहे. 20 दिवसांपासून DCGI च्या 20 ते 25 टीम देशातील विविध राज्यांमधील फार्मा कंपन्यांची तपासणी करत आहेत. या दरम्यान, जिथे निर्धारित मानकांनुसार औषधे उपलब्ध नाहीत तिथले परवाने रद्द केले जात आहेत.
हिमाचल प्रदेशातील 70, मध्य प्रदेशातील 23 आणि उत्तराखंडमधील 45 कंपन्या आहेत. औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडियाने फार्मा कंपनीवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी हिमाचल आणि उत्तराखंडमधील काही फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. लोकांपर्यंत ही औषधे ऑनलाइन पोहोचवणाऱ्या दोन कंपन्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने औषधांच्या ऑनलाइन वितरणावर बंदी घातली असताना, मग त्या ऑनलाइन औषधांची विक्री का करत आहेत, असे या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्याकडून जाब विचारण्यात आला असून योग्य उत्तर न मिळाल्याने कारवाईचा बडगा उचलण्यात आला.