मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खूशखबर! येत्या आठवड्यांत आणखी घसरणार GOLD PRICE; पाहा किती स्वस्त होणार सोनं

खूशखबर! येत्या आठवड्यांत आणखी घसरणार GOLD PRICE; पाहा किती स्वस्त होणार सोनं

Gold and silver price : आजचे सोन्याचांदीचे दर काय आहेत ते पाहा.

Gold and silver price : आजचे सोन्याचांदीचे दर काय आहेत ते पाहा.

Gold and silver price : आजचे सोन्याचांदीचे दर काय आहेत ते पाहा.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 12 मार्च :  बुधवारी म्हणजे 10 मार्चपर्यंत सोन्याच्या (Gold and silver price) किंमतीत सलग घसरण पाहायला मिळत होती. गुरुवारी सोन्याचे दर किरकोळ (Gold and silver latest price) प्रमाणात वाढले. त्यानंतर आता पुन्हा सोनं महाग होतं की काय? असंच वाटू लागलं. पण शुक्रवारी सोन्याच्या दरात (Gold and silver price update) पुन्हा घसरण पाहायला मिळाली.

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या (Gold and silver rate) दरात 0.3% घट झाली आहे. सोनं प्रति ग्रॅम 44,731 झालं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.2% घसरून 1,718 डॉलर प्रति औंसवर आलं आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत. चांदीची किंमत 0.5% कमी झाली आहे. आजचा चांदीचा दर प्रतिकिलो 67,177 रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 26.11 डॉलर प्रति औंस आहे.

हे वाचा - सामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, शुक्रवारी  12 मार्चला 24 कॅरेट सोनं 79 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 44601  आहे.  तर 23, 22 आणि 18  कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 44422, 40855 आणि 33451 रुपये आहे. तर चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. चांदी आज प्रति किलो 110 रुपयांनी वाढून 66480 वर पोहोचली आहे. IBJA द्वारा जारी करण्यात आलेले हे रेट देशभरात आहेत. या रेटमध्ये जीएसटीचा समावेश नाही.

हे वाचा - कमाई करण्यासाठी BEST पर्याय, 5000 रुपये गुंतवणून लाखो मिळवा; सरकारही करेल मदत

ऑगस्ट, 2020 पासून आतापर्यंत सोनं प्रति ग्रॅम 11,691  स्वस्त झालं आहे.ऑगस्टमध्ये सोनं 57,000 रुपये होतं. म्हणजेच सोन्याचे दर 20.80% घटले आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोनं आणखी घसरू शकतं. सोन्याचे भाव  1500 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकतात. म्हणजे सोनं जवळपास  40000 हजार रुपयांच्या खाली येऊ शकतं.  ज्यानंतर सोन्याच्या किमती स्थिरावतील.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Money