जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त बिअर आणि समुद्रकिनारेच नाही, तर गोव्यातील 6 ठिकाणं तुमचा उन्हाळा मजेशीर करतील

फक्त बिअर आणि समुद्रकिनारेच नाही, तर गोव्यातील 6 ठिकाणं तुमचा उन्हाळा मजेशीर करतील

फक्त बिअर आणि समुद्रकिनारेच नाही, तर गोव्यातील 6 ठिकाणं तुमचा उन्हाळा मजेशीर करतील

तुम्हीही गोव्याच्या सहलीवर जाण्याचा विचार करत असाल, तर नक्की या ऑफबीट पर्यटनाचासुद्धा आनंद घ्या.

  • -MIN READ Trending Desk Goa
  • Last Updated :

    गोवा, 8 मे : गोव्याचं नाव घेताच समोर सुंदर समुद्रकिनाऱ्याचं चित्र येतं. पण गोव्याचं सौंदर्य फक्त इतकंच मर्यादित नाही. गोव्याला निसर्गाची सुंदर देणगी मिळाली आहे गोव्यात सुंदर समुद्रकिनाऱ्याशिवाय इतरही काही ऑफबीट गोष्टी आहेत, ज्यांचा एक पर्यटक म्हणून तुम्ही अनुभव घेऊ शकता. सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाइफ आणि सीफूडसाठी ओळखलं जाणारं गोवा हे राज्य नेहमीच आरामदायी जीवनशैलीशी संबंधित आहे. पण गोव्यात समुद्र किनाऱ्याशिवायही पर्यटकांसाठी बरंच काही आहे. चला तर, अशाच काही ऑफबीट गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. 1. हेली पर्यटन गोव्याच्या पर्यटनाचा अनुभव अनोख्या पद्धतीनं घेण्याच्या शोधात असणाऱ्यांसाठी हेली पर्यटन हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये पर्यटक हेलिकॉप्टर राईड करू शकतात आणि राज्याच्या आश्चर्यकारक लँडस्केपचं विहंगम दृश्य आकाशातून पाहू शकतात. हेलिकॉप्टर राइड्सद्वारे समुद्रकिनारा, प्रदेश आणि राज्यातील विविध ऐतिहासिक वास्तूंचं विहंगम दृश्य पाहता येतं. 2. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स ट्रिप करायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला गोवा हा उत्तम पर्याय आहे. घनदाट जंगलात झिपलायनिंग आणि रॅपलिंग करण्यापासून ते ऑफ-रोडिंग आणि खडबडीत भू प्रदेशांमध्ये क्वाड-बाईकिंगपर्यंत, भरपूर एड्रेनालाईन-पंपिंग अ‍ॅडव्हेंचरचा आनंद येथे घेता येईल. 3. शेतीला भेट गोव्यातील हिंटरलँड पर्यटनामध्ये शेतातील भेटींचाही समावेश होतो, येथे पर्यटक सेंद्रिय शेती पद्धतींबद्दल जाणून घेऊ शकतात, फार्म-टू-टेबल अनुभव घेऊ शकतात, ताज्या स्थानिक उत्पादनांचा आनंद घेऊ शकतात. स्थानिकांनी अवलंबलेल्या शाश्वत शेती पद्धती समजून घेण्याचा आणि गोव्यातील अस्सल चव चाखण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. उन्हाळी पिकनिकसाठी ‘या’ 7 जागा ठरतील सर्वोत्तम पर्याय; एकदा आवश्य भेट द्या 4. मसाले फार्म गोव्याच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मसाल्यांच्या मळ्यांना भेट देणं. पर्यटक य़ेथे भेट देऊन, गोव्यात पिकवल्या जाणाऱ्या विविध मसाल्यांबद्दल जाणून घेऊ शकतात आणि त्यापैकी काहींचे नमुनेसुद्धा सोबत आणू शकतात. फोंडा येथील सहकारी मसाले फार्म हे मसाल्याच्या टूरसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, जेथे पर्यटक गोव्याच्या पारंपरिक जेवणाचा आनंद घेऊ शकतात. 5. दूधसागर धबधबा ट्रेक दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक आहे. येथे एका थरारक ट्रेकद्वारे पोहोचता येतं. धबधब्यापर्यंत जाणारी पायवाट तुम्हाला घनदाट जंगलं, ओढे आणि रेल्वे रुळांच्या जवळून घेऊन जाते. खडकांवरून खाली पडणाऱ्या धबधब्याचं विलोभनीय दृश्य इथे पाहता येईल. 6. संस्कृती आणि परंपरा गोव्यातील हिंटरलँड पर्यटनदेखील स्थानिक संस्कृती आणि परंपरांमध्ये सहभागी होण्याची भरपूर संधी देतं. पर्यटक स्थानिक समुदायांशी संवाद साधू शकतात, त्यांच्या चालीरीती, कला आणि हस्तकला जाणून घेऊ शकतात. या प्रदेशाच्या समृद्ध वारशाची झलक पाहण्यासाठी सांस्कृतिक उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्हीही गोव्याच्या सहलीवर जाण्याचा विचार करत असाल, तर नक्की या ऑफबीट पर्यटनाचासुद्धा आनंद घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: beach , beer , goa
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात