वॉशिंग्टन, 09 ऑगस्ट : सध्या संपूर्ण जग कोरोना, मंकीपॉक्सशी लढा देत आहेत. हे संकट कमी की काय म्हणून जगावर आणखी एका संकटाचं सावट आहे. अवघ्या १० दिवसांतच पृथ्वीवर मोठं संकट येणार आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या संकटाबाबत तज्ज्ञांनी सावध केलं आहे. त्यामुळे आता धास्ती अधिक वाढली आहे. तसे भविष्याबाबत बरचे दावे केले जातात. ज्योतिषी, टाइम ट्रॅव्हर्स किंवा आपण भविष्य ओळखू शकत असल्याचा दावा करणारे स्वयंघोषित भविष्यकर्तेही भविष्यात घडणाऱ्या संकटांबाबत वारंवार सांगत असतात. यापैकी काही भविष्यवाणी खऱ्या ठरतात तर काही नाही. आता अशीच एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. पृथ्वीवर अवघ्या 10 दिवसांतच मोठं संकट येतं आहे. ही भविष्यवाणी चिंतेची आहे, कारण ही कुणी ज्योतिषी किंवा टाइम ट्रॅव्हलरने नाही तर नासाने केली आहे. हे वाचा - ना पॅराशूट ना हॉट एअर बलून; पक्ष्यासारखे पंख पसरून उडू लागला माणूस; पाहा अद्भुत VIDEO
नासा ही अमेरिकन अंतराळ संस्था आहे. जी अंतराळातील घटनांवर लक्ष ठेवू असते. आता अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने एक संकट येत असल्याबाबात नासाने सावध केलं आहे. एक भलामोठा उत्कापिंड पृथ्वीला धडकणार असल्याचं नासाने सांगितलं आहे. गेल्या महिन्यातच हा उल्कापिंड नासाला दिसला आणि आता फक्त 10 दिवसांत म्हणजे 18 ऑगस्टला तो पृथ्वीच्या कक्षेतून जाईल. धरतीपासून तो फक्त 6.3 दशलक्ष किलोमीटरहून जाईल. पृथ्वीला तो थेट धडकणार नाही, कडेने जाईल त्यामुळे तसा धोका कमी आहे. पण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला आपल्याकडे खेचू शकते. त्यामुळे धोका पूर्णपणे टळलेला नाही. हा खूप मोठा उल्कापिंड आहे. हे वाचा - VIDEO - खाताच बेडकांना बसला ‘440 व्होल्टचा झटका’; कोण आहे हा किडा तुम्ही सांगू शकता का? याशिवाय ऑगस्टमध्ये आणखी एक उल्कापिंड पृथ्वीजवळून जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 ऑगस्टला हा उल्कापिंड पृथ्वीजवळू जाऊ शकतो. पण जोपर्यंत तो पृथ्वीपर्यंत पोहोचेल तोपर्यंत त्याचा आकार कमी होईल.