मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अजब प्रथा! हसत हसत या महिला खातात चाबकाचे फटके, कारण वाचून व्हाल थक्क

अजब प्रथा! हसत हसत या महिला खातात चाबकाचे फटके, कारण वाचून व्हाल थक्क

इथियोपिया (Ethiopia) या देशातील हमर जमातीत (Hamar tribe) आजही जगावेगळ्या प्रथा पाळल्या जातात.  या जमातीतल्या महिला अगदी रक्त येईपर्यंत मार खातात, चाबकाचे फटके खातात. काय आहे या अजब प्रथेमागचं कारण?

इथियोपिया (Ethiopia) या देशातील हमर जमातीत (Hamar tribe) आजही जगावेगळ्या प्रथा पाळल्या जातात. या जमातीतल्या महिला अगदी रक्त येईपर्यंत मार खातात, चाबकाचे फटके खातात. काय आहे या अजब प्रथेमागचं कारण?

इथियोपिया (Ethiopia) या देशातील हमर जमातीत (Hamar tribe) आजही जगावेगळ्या प्रथा पाळल्या जातात. या जमातीतल्या महिला अगदी रक्त येईपर्यंत मार खातात, चाबकाचे फटके खातात. काय आहे या अजब प्रथेमागचं कारण?

अदिस अबाबा (इथियोपिया), 9 डिसेंबर : जगभरात अनेक देशांमध्ये कितीतरी जुन्यापुराण्या प्रथा, परंपरा आजही कायम आहेत. आफ्रिकेसारख्या देशांमधील काही विचित्र परंपरा आहेत. इथियोपिया (Ethiopia) या देशातील हमर जमातीत (Hamar tribe) आजही जगावेगळ्या प्रथा पाळल्या जातात.  या जमातीतल्या महिला अगदी रक्त येईपर्यंत मार खातात, चाबकाचे फटके खातात. काय आहे या अजब प्रथेमागचं कारण? जाणून घेऊ या.

(Ethiopia) या देशाला हॉर्न ऑफ आफ्रिका अशी ओळख असून ह्याची राजधानी एडिस अबाबा आहे. या देशातील हमर जमातीत (Hamar tribe) आजही जगावेगळ्या प्रथा पाळण्यात येतात.  तसेच निरनिराळे समारंभ साजरे केले जातात. विवाह करण्यासाठी या जमातीतील मुलांना आणि मुलींना या प्रथा पाळाव्या लागतात. आपल्याला सगळ्यात तरुण पती मिळावा या इच्छेने इथल्या तरुण मुली चाबकाचे फटके मारून घेतात.

काय आहे इथियोपियाचा 'उकुली तुला' समारंभ ?

हमर ही इथियोपियातील पशुपालन करणारी आदिवासी जमात आहे. ओमोटिक किंवा ओमिक समुदायाशी ते जोडलेले आहेत. प्राण्यांची शिकार करणं, पशुपालन आणि शेती हे त्यांचे मुख्य उद्योग आहेत. या समाजात उकुली तुला (Bull Jumping) हा एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा समारंभ असतो. साधारण जुलै ते मार्च दरम्यान हा समारंभ आयोजित केला जातो. दिवसभर चालणाऱ्या समारंभात संध्याकाळी मुख्य कार्यक्रम सुरू होतो. याच समारंभात तरुण मुलांना विवाहाची परवानगी दिली जाते, मात्र त्याआधी त्याला आपण लग्नाची जबाबदारी घेण्यास आणि कुटुंबाचे पालन पोषण करण्यास सक्षम आहोत हे सिद्ध करावे लागते. या परीक्षेत तो तरुण उत्तीर्ण झाला तरच त्याला लग्न करण्याची परवानगी दिली जाते.

या समारंभात सहभागी होणाऱ्या तरुणांच्या कुटुंबांकडून ज्या घरात लग्नायोग्य मुली आहेत, त्या कुटुंबांना सुकलेल्या गवतापासूनबनवलेली दोरी पाठवून समारंभात येण्याचे आमंत्रण दिले जाते. काही दिवस चालणाऱ्या या समारंभात नृत्य केलं जातं, फळांची बियर, कॉफी, जेवण यांची रेलचेल असते. यामध्ये सहभागी झालेल्या कुमारिका आपले केस आणि शरीर लोण्यानं माखतात. नाचत, गात त्या मुलांना परीक्षा यशस्वीपणे पार करण्यासाठी प्रोत्साहन देतात.मुलांची परीक्षा घेण्यासाठी 15 गायी किंवा बैलांना एकत्र उभे केले जाते. लग्नासाठी इच्छुक मुलाला उड्या मारत हा तांडा पार करायचा असतो. जो मुलगा हे आव्हान पार करतो, त्याला आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्याचा अधिकार मिळतो.यात कोणी नापास झाले तर मात्र त्याची काही खैर नसते. त्याचे लग्न तर होत नाहीच; पण महिला एकत्र येऊन त्याला बदडतात. एवढचं नाही तर, त्या मुलाच्या घरातील सर्व महिलांनाही अगदी अंगातून रक्त येईपर्यंत मारले जाते.

पुरुषांना मारण्यासाठी का विनवतात महिला ? 

लग्नासाठी इच्छुक मुलींना, महिलांना रक्त येई पर्यंत चाबकाने, छडीनं मारलं जातं. या समारंभात सर्वात जास्त मार खाणाऱ्या स्त्रीचे लग्न सर्वात तरुण मुलाशी होते. त्यामुळं त्या याला विरोध करत नाहीत की पळून जात नाहीत; चुकून कोणाला मार मिळाला नाही तर त्या मुली रक्त येईपर्यंत मारण्याची विनंती करतात. विधवा महिलाही यात भाग घेऊ शकतात आणि पुनर्विवाहासाठी आपल्याला हव्या असलेल्या पुरुषाशी लग्न करू शकतात.

मुलींना, महिलांना मारण्याचे काम ‘माजा’ (Maja) नावाने ओळखले जाणारे खास लोक करतात. धार्मिक विधी करणारे हे लोक असतात. हे लोक पंख, हार आणि बांगड्या आदी दागिने धारण करतात. त्यांच्या एका हातात एक लांब, पातळ छडी असते, तर दुसऱ्या हातातचाबूक असतो. ते लग्नासाठी इच्छुक असलेल्या सर्व मुली, महिला यांना त्या छडी आणि चाबकाचे फटके मारतात. या वेळी कोणीही पळून जात नाही. ज्या मुली या फटक्यांपासून वंचित राहतात, त्या या पुरुषांना मारण्याची विनंती करतात. या मारामुळे शरीरावर होणाऱ्या जखमा म्हणजे आशीर्वाद असतात, अशी त्यांची धारणा आहे. तर, छडी आणि चाबकाचे फटके खाल्ल्यानं महिलांमधील प्रेम करण्याची क्षमता वाढते असं माजा पुरुषांचे मानणे आहे. महिलांना त्यांच्या इच्छेनुसार लग्नानंतरही दोन मुलं होईपर्यंत मारतात.

चाकूने शरीरावर टॅटू बनवतात पुरुष –

या हमर जमातीतील पुरुषांमध्येही एक अघोरी प्रथा आहे. ती म्हणजे पुरुष चाकूने आपल्या शरीरावर वार करून टॅटू (Tatoo) बनवतात. चाकूने केलेल्या जखमा राख आणि कोळश्याच्या पुडीने भरतात. या जमातीतील पुरुष शिकार केलेल्या प्राण्यांच्या केसापासून बनलेले दागिने घालतात.

First published: