मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ही एअरलाईन कंपनी आता करणार नाही 'लेडीज ऍण्ड जंटलमेन' घोषणा; जाणून घ्या कारण

ही एअरलाईन कंपनी आता करणार नाही 'लेडीज ऍण्ड जंटलमेन' घोषणा; जाणून घ्या कारण

आपण पाहतो की विमानातील खिडक्या (Why aeroplane’s windows are round) या नेहमी गोल असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

आपण पाहतो की विमानातील खिडक्या (Why aeroplane’s windows are round) या नेहमी गोल असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

जर्मनीतील (Germany) एका एअरलाईन्स कंपनीने आपल्या प्रवाश्यांचे संबोधन जेंडर फ्री (Gender Free) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जर्मनीतील लुफ्तान्सा एअरलाईन्सकडून (Lufthansa Airlines) उड्डाणादरम्यान लेडीज ऍण्ज जंटलमेन ही उद्घोषणा ऐकायला मिळणार नाही.

पुढे वाचा ...

  बर्लिन, 17 जुलै : जगात विविध संस्कृतींच्या अनुषंगाने परंपरादेखील वैविध्यपूर्ण आहेत. स्वागतपर संबोधनात किंवा घोषणेत सांस्कृतिकदृष्टया काही चूक होऊन एखाद्या प्रवाश्याच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची विमानप्रवासादरम्यान विशेष काळजी घेतली जाते. हा सांस्कृतिक फरक अनेकदा मोठ्या गंभीर अडचणी निर्माण करु शकतो. परंतु, अशा कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता जर्मनीतील (Germany) एका एअरलाईन्स कंपनीने आपल्या प्रवाश्यांचे संबोधन जेंडर फ्री (Gender Free) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जर्मनीतील लुफ्तान्सा एअरलाईन्सकडून (Lufthansa Airlines) उड्डाणादरम्यान लेडीज ऍण्ज जंटलमेन ही उद्घोषणा ऐकायला मिळणार नाही. या प्रकारचा निर्णय अनेक एअरलाईन्स कंपन्या आता घेत आहेत.

  जेंडर न्यूट्रल भाषा

  लुफ्तान्सा एअरलाइन्सने आता जेंडर न्यूट्रल (Gender Neutral) म्हणजेच लिंगनिरपेक्ष भाषेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल लुफ्तान्सा समूह संचालित ऑस्ट्रियन एअरलाईन्स, स्विस ऍण्ड युरोविंग्ज या विमानसेवा कंपन्यांनाही लागू असेल. कंपनीच्या प्रवक्त्या आंजा स्टेनजर यांनी डीडब्ल्यू वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं की विविधता हा केवळ एक वाकप्रचार नसून लुफ्तान्सासाठी ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता आम्ही हा दृष्टीकोन आमच्या भाषेतून व्यक्त करणार आहोत.

  अशा असतील घोषणा

  लुफ्तान्सा क्रु आता प्रिय पाहुण्यांनो (Dear Guest), शुभ प्रभात – शुभ संध्याकाळ किंवा बोर्डमध्ये आपलं स्वागत आहे, अशा लिंगनिरपेक्ष वाक्यांचा वापर करणार आहे. यापैकी कोणती वाक्यं वापरुन प्रवाश्यांचे स्वागत करायचं याचा निर्णय क्रू मेंबर्स (Crew Members) घेतील. या बदलाबाबत क्रु मेंबर्सला मे महिन्यात माहिती देण्यात आली होती.

  असा होईल मोठा फायदा

  बेलफिल्ड युनिव्हर्सिटीतील सामाजिक आणि अर्थिक विशेषज्ञ अलेक्झेंड्रा स्किले यांनी हे पाऊल प्रतीकात्मक स्तरावर कार्य करते, असं म्हटलं आहे. डीडब्ल्यूच्या वृत्तात त्यांनी म्हटले आहे की, हे लिंग संवेदनशील पाऊल म्हणता येईल. यामुळे लिंग भेदभावाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. यामुळे ज्या व्यक्ती स्त्री किंवा पुरुषांपेक्षा स्वतःला भिन्न समजतात, त्यांना या घोषणेमुळे त्रयस्थासारखं वाटणार नाही.

  संपूर्ण जग हाच ट्रेंड स्वीकारतंय

  लिंग भेदभावापासून मुक्त होण्यासाठी आणि भिन्न लिंगी समूहांना आपल्या कार्यात समाविष्ट करुन घेतलं आहे, असे वाटण्यासाठी लुफ्तान्साने घेतलेल्या या निर्णयाचं अनुकरण जगभरातील अनेक कॉर्पोरेशन आणि संघटना करत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनेदेखील नॉनजेंडर भाषेचा समावेश आपल्या कार्यात करुन घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  लिंगनिरपेक्ष की जेंडर न्यूट्रल भाषा

  युरोपियन इन्स्टिट्युट फॉर जेंडर इक्वॉलिटीने केलेल्या लिंगनिरपेक्ष भाषेच्या व्याख्येनुसार, ही एक अशी भाषा असते की जी विशिष्ट लिंग असलेल्या व्यक्तींसाठी वापरली जात नाही आणि या भाषेच्या माध्यमातून स्त्री किंवा पुरुष असा कोणताही संदर्भ न देता सामान्य लोक म्हणून वागणूक दिली जाते. युरोपीय संसदेत 2018 मध्ये हॅंडबुक ऑन जेंडर न्युट्रॅलिटी इन लँग्वेज प्रकाशित करण्यात आले होते. सर्व लिंगांचा समावेश करून घेणारी भाषा ही राजकीय सूक्ष्मतेपेक्षा महत्वाची आहे, असं मत या पुस्तकातून व्यक्त करण्यात आलं होतं.

  वैविध्यपूर्ण संबोधनं

  जर्मन भाषेत आज्ट (Arzt) असं पुरुष डॉक्टरांना आणि एस्टिन असं महिला डॉक्टरांना संबोधलं जातं. तसंच पुरुष संपादकांना रिडक्टर आणि महिला संपादकांना रिडक्टरलिन असं म्हटलं जातं. अशा प्रकारे संबोधन करण्यावरुन तिथे अनेक वाद सुरु असून, अशी संबोधनं वापरणं बंद करण्याची मागणी केली जात आहे.

  मागील आठवड्यात अमेरिकी ऑटोमोबाईल कंपनी फोर्डने (Ford) असा निर्णय घेतला की आम्ही आता चेअरमनऐवजी चेअर या शब्दाचा वापर करणार आहोत. जगभरात लिंग समानतेच्या अनुषंगाने जागृती करण्यासाठी मोठे काम होत आहे. तसेच तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लिंगनिरपेक्ष भाषेचा वापर करण्याची गरज वाढत आहे. लुफ्तान्साच्या निर्णयचा आदर्श घेऊन इतर कंपन्याही प्रवाश्यांच्या संबोधनात बदल करतील अशी आशा करायला हरकत नाही.

  First published:

  Tags: Airplane, Travel by flight