जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर कुठे ठेवायचा? 'ही' आहे सर्वात सुरक्षित जागा

स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर कुठे ठेवायचा? 'ही' आहे सर्वात सुरक्षित जागा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एलपीजी सिलेंडरबाबत सुरक्षेच्या काही टीप्स.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    मुंबई, 21 एप्रिल : गॅस सिलिंडर ही घरातली जितकी उपयुक्त तितकीच धोकादायक गोष्ट असते. गॅस हा अत्यंत ज्वलनशील घटक असल्याने त्यासाठी खूप जास्त सुरक्षितता बाळगली पाहिजे. ती न बाळगल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. गॅस गीझरसाठी वापरण्यात येणारा सिलिंडर बाथरूममध्ये न ठेवण्याचा सल्ला कायम दिला जातो; मात्र स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलिंडर कुठे ठेवावा हेदेखील जाणून घेतलं पाहिजे. देशातल्या अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस वापरला जातो. घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचावा यासाठी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली आहे. यामुळे खेडोपाडी एलपीजी सिलिंडर कनेक्शन पोहोचलं आहे; मात्र गॅस सिलिंडर वापरण्यासोबत त्यापासून सुरक्षितता मिळवण्यासाठीचे काही नियमही पाळले पाहिजेत. सिलिंडर देणाऱ्या कंपन्याही ग्राहकांना तशा सूचना देतात. सिलिंडर ठेवण्याच्या जागेपासून ते सिलिंडरच्या नळीपर्यंत सुरक्षाविषयक अनेक उपायांचा त्यात समावेश असतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गॅस सिलिंडर कुठे ठेवावा? बहुतांश जणांच्या स्वयंपाकघरातच गॅस सिलिंडर असतो; मात्र हा सिलिंडर लांब नळी लावून स्वयंपाकघरापासून दूर ठेवला तर उत्तम असतं. अर्थात हे सगळीकडे शक्य नसतं. त्यामुळे किमान हवेशीर जागी सिलिंडर ठेवावा. शक्यतो थेट उन्हात सिलिंडर असू नये. गॅस सिलिंडरमधून का येतो उग्र वास? यामुळेच वाचतो तुमचा जीव विजेच्या बटणांपासून दूर ठेवावा गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाली, तर तो गॅस एका ठिकाणी राहत नाही. तो सगळीकडे पसरतो. त्यामुळेच सिलिंडर हवेशीर जागी ठेवावा; मात्र विजेच्या बोर्डपाशी तो शक्यतो ठेवू नये. तसंच टीव्ही किंवा विजेवरच्या इतर उपकरणांजवळही असू नये. समस्या असल्यास वितरक कंपनीला कळवा तुमची गॅस शेगडी, नळी, रेग्युलेटर किंवा सिलिंडरमध्ये काही समस्या असल्यास तत्काळ वितरक कंपनीला कळवावं. कंपनीकडून दुरुस्तीसाठी मेकॅनिक पाठवला जातो; मात्र स्वतःच त्यावर काही उपाय करायचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. Gas Cylinder : डिलिव्हरी मॅन अतिरिक्त पैसे मागतोय? ‘इथं’ करा तक्रार गॅस सिलिंडर घरी येतो, तेव्हाही ग्राहकांनी जागरूक राहिलं पाहिजे. सिलिंडरवर ‘BIS अप्रूव्ह्ड’ असं लिहिलेलं आहे का ते पाहावं. सिलिंडर नेहमी अधिकृत वितरण कंपनीकडूनच घ्यावा. तसंच सिलिंडर विकत घेताना त्यावर कंपनीचं सील आहे याची खात्री करावी. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे गॅस सिलिंडर वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. गॅस सिलिंडर ठेवण्याची जागा निवडण्यापासून ते त्याची नळी व रेग्युलेटरपर्यंत सगळ्याच गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: gas , lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात