दिल्ली, 6 सप्टेंबर : गणेश चतुर्थी आणि हरतालिकेप्रमाणे ऋषिपंचमीचं व्रत महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. गणपतीच्या दुसऱ्या दिवशीचं येणारं हे व्रत. याच दिवशी ऋषिंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते आणि कळत नकळत घडलेल्या पापांपासून मुक्तता व्हावी यासाठी ऋषींना मनोभावे वंदन केलं जातं. ऋषिपंचमीचं व्रत सौभाग्यवती महिलांनी करायचं असतं. या दिवशी स्त्रियांनी धान्य खायचं नसतं. काही ठिकाणी बैलाचे पाय न लागलेल्या तांदूळाची भाकरी आणि शेताच्या बांधावर मिळणारी भाजी केली जाते. यासाठी तेल, मिरची ही वेगळ्या पद्धतीने उगवलेली असते. हल्ली बाजारातही ग्रामीण महिला हे साहित्य घेऊन विकायला येतात. ऋषिंची भाजीही वेगळ्या पद्धतीची असते. ऋषी ज्या प्रमाणे कंदमुळं गोळा करून खायचे तशीच ही भाजी असते. ( Ganesh Chaturthi 2021: घरीच करा गणपतीसाठी मखर; अर्ध्या तासात पूर्ण होईल सजावट ) पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या यात वापरातात. अळूची पानं, देठं, अळकुंडी, रताळं, भेंडी, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, खोबरं घालतात, मिरच्या घातलात. बैलाच्या किंवा पुरुषाच्या हातचं चालत नसल्याने मोठ्याचं तेल किंवा तूप वापरतात.
ऋषिच्या उपासासाठी भाकरीही वेगळी असते. बैलाचा वापर केलेलं शेतातलं तांदूळ चालत नाहीत त्यासाठी वेगळं भाकरीचं पिठ मिळतं. ( गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी? ) मीठसुद्धा कुत्र्याचे पाय न लागले चालतंत. हा उपास अतिशय कठीण असतो. या व्रताच्या काळात पुरुषांचं तोंड पाहायचं नसतं, अशी समजूत आहे.

)







