Home /News /lifestyle /

हरतालिका व्रतात करू नका ‘या’ चुका; होणार नाही पूर्ण फलं प्राप्ती

हरतालिका व्रतात करू नका ‘या’ चुका; होणार नाही पूर्ण फलं प्राप्ती

Ganesh Chaturthi 2021 – मनासारखा वर मिळवण्यासाठी कुमारिका हरतालिकेचं व्रत करतात. त्यासाठी दिवसभर कडक उपवास करावा लागतो.

    दिल्ली, 7 सप्टेंबर : भगवान शंकर पती म्हणून लाभावेत यासाठी पार्वतीने केलं व्रत म्हणजेच हरतालीकेच व्रत. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केल जातं. या व्रताबद्दल एक कथा सांगितली जाते. हिमालय पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वती या नावानेही ओळखली जाते. गौरीला भगवान विष्णूचं मागणं घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. हिमालयाने अतिशय आनंदने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण, पार्वतीने आधीपासून शंकराला पती म्हणून वरलं होतं. पण, पित्याने विष्णूशी लग्न ठरवल्यामुळे, पार्वती शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करू लागली. शिवाला अखंड उपासनेने प्रसन्न केलं आणि आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटलं. त्यानंतर दोघांचं लग्न झालं. त्यामुळे आजही कुमारिका मुली चांगला पती मिळवा म्हणून हरतालीकेचं व्रत करतात. (आजही पृथ्वीवर आहे कृष्णाचं हृदय; हैराण करणारं हे रहस्य माहिती आहे का?) हे व्रत महिला आणि कुमारीका करतात. या दिवशी निर्जला एकादशी प्रमाणे उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन करतात. भविष्योत्तर पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला 'हस्तगौरी, 'हरिकाली किंवा 'कोटेश्वरी' व्रताचंही पालन करण्यात येतं. या दिवशी आदी शक्तीमाता पार्वतीचं गौरीच्या रुपात पूजन करण्यात येतं. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचं अनुष्ठान होतं. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होतं. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीला या व्रताचं पालन करण्यास सांगितलं होतं. या दिवशी घरी गौरीची मुर्ती आणतात आणि वाळूची शंकराची पिंड तयार करून तिची पुजा करतात. (गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी?) पाच विडे मांडून सुपारी, खारीक, बदाम, नाणं, फळ ठेवतात. आधी स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवतात. अक्षदा, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करून हरतालिकेच्या पूजेला बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पानं वाहतात. फळं, दूध याचा नैवेद्य दाखवतात आणि मानतली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. उपवासात हे टाळावं हे व्रत उशीरा करू नये. पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताला सुरूवात करावी. शक्यतो निर्जली उपवास करतात. त्यामुळे खाणं टाळावं. (Ganesh Chaturthi 2021: घरीच करा गणपतीसाठी मखर; अर्ध्या तासात पूर्ण होईल सजावट) मीठ घातलेला कोणताही पदार्थ टाळावा या उपवासाला फलाहार चालतो. पण, खिचडी, शेंगदाणे, वेफर्स असे इतर उपवासांना चालणारे पदार्थ चालत नाहीत. हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उद्यापन किंवा उत्तपूजा करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Culture and tradition, Festival, Ganesh chaturthi

    पुढील बातम्या