मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनावर मात केल्यानंतर Mucormycosis चा धोका; बऱ्या झालेल्या रुग्णांना होतंय गंभीर इन्फेक्शन

कोरोनावर मात केल्यानंतर Mucormycosis चा धोका; बऱ्या झालेल्या रुग्णांना होतंय गंभीर इन्फेक्शन

Mucormycosis after coronavirus : कोरोनासारख्या भयंकर संसर्गावर मात केल्यानंतर आणखी एका दुसऱ्या संसर्गाला सामोरं जावं लागतं आहे.

Mucormycosis after coronavirus : कोरोनासारख्या भयंकर संसर्गावर मात केल्यानंतर आणखी एका दुसऱ्या संसर्गाला सामोरं जावं लागतं आहे.

Mucormycosis after coronavirus : कोरोनासारख्या भयंकर संसर्गावर मात केल्यानंतर आणखी एका दुसऱ्या संसर्गाला सामोरं जावं लागतं आहे.

पिंपरी-चिंचवड :  कोरोनातून बहुतेक रुग्ण बरे होते आहेत. पण आता या रुग्णांसमोर नवं संकट आहे. या रुग्णांच्या नाकातोंडात बुरशी होत असल्याचं दिसून आलं आहे (Fungal infection in corona patient). विशेषतः मधुमेही रुग्णांना ही समस्या बळावते आहे. पिंपरी-चिंचवड यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात असे बरेच रुग्ण आढळले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोरोना आजारातून बरे झालेल्या पण  कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेही रुग्णांना वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्या वर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये काळसर अशी बुरशी तयार होऊन म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत.

रुग्णालयातील दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी सांगितलं, म्युकोरमायकोसिस ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर या प्रकारच्या बुरशीचा शरीरामध्ये संसर्ग होतो. श्वासोच्छ्वासावाटे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर फुप्फुस तसंच वरच्या जबड्यातील सायनसमध्ये आणि वरच्या जबड्यावर दुष्परिणाम होतो. बुरशीचा संसर्ग वाढून प्रसंगी डोळ्यापर्यंत आणि मेंदूपर्यंत प्रादुर्भाव होऊ शकतो.

हे वाचा - धक्कादायक! Homeopathic medicine घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असेल आणि  मधुमेही रुग्णाचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असेल अशा रुग्णास कोविड उपचारादरम्यान अतिप्रमाणात स्टेरॉइड आणि वायरल लोड, सायटोकाइन स्टॉर्म कमी करण्यासाठी रेमडेसेवीरसारखं इंजेक्शन द्यावं लागतं. यामुळे सीरम आयर्नचा लोड वाढतो, असं डॉ. यशवंत इंगळे म्हणाले.

म्युकोरमायकोसिसची लक्षणं

तीव्र डोकेदुखी

अंगात सतत बारीक ताप असणं

गालावर सूज किंवा बधिरपणा येणं

नाक गळणं

जबड्यातील हिरड्यांवर पू  असलेल्या पुळ्या येणं

वरच्या जबड्यातील दातांचं हलणं

जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणं.

वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणं.

आजार टाळण्याचे उपाय

तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणानं धुणं

मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणं.

रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणं.

लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि उपचार करणं.

हे वाचा - Second Wave of Corona: भारतानं वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयातील कान-नाक -घसा विभाग आणि दंतरोग विभागांमध्ये अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत, अशी माहिती दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे आणि कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अनिकेत लाठी यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Health