जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Fruit Benefits : 'या' हिरव्या फळाचं नाव माहितीये? फायदे वाचला तर चकित व्हाल!

Fruit Benefits : 'या' हिरव्या फळाचं नाव माहितीये? फायदे वाचला तर चकित व्हाल!

या फळामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन आणि मधुमेह नियंत्रित करते.

या फळामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन आणि मधुमेह नियंत्रित करते.

आपल्यापैकी बहुतेक लोकांना या फळाचे नाव माहिती नसेल. पण हे फळ खूप मोहक आहे, ज्यामध्ये भरपूर फायबर असते जे पचन आणि मधुमेह नियंत्रित करते. यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : हे असे फळ आहे ज्याचे, नाव आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेही नसेल, पण हे फळ खूप मौल्यवान आहे. ज्यामध्ये औषधी गुणधर्मांचा खजिना दडलेला आहे. फोटोत ते फणसासारखे दिसत असला तरी ते आतून पूर्णपणे वेगळे आहे. पिकल्यावर त्याची चव पोळीसारखी लागते. त्यामुळे या फळाला ब्रेडफ्रूट असे नाव देण्यात आले आहे. याला इतर भाषेत वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. एन लक्ष्मी, कमिनेनी हॉस्पिटल हैदराबाद येथील वरिष्ठ आहारतज्ज्ञ, इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हणतात की, ब्रेडफ्रूट हे दक्षिण पॅसिफिक प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. परंतु आजकाल ते जगाच्या बहुतांश भागात घेतले जात आहे. जेव्हा ते पिकते तेव्हा त्याच्या आत मऊ आणि कस्टर्ड सारखा लगदा असतो. हे आतून बटाट्यासारखे दिसते. त्याची चव रताळ्यासारखी असते. हे फळ भाकरी, तांदूळ किंवा गहू यांना पर्याय म्हणून खाल्ले जाऊ शकते.

Morning Tips : सकाळी उठल्यानंतर आधी करा हे काम, चेहऱ्यावर नेहमी दिसेल नैसर्गिक चमक

ब्रेडफ्रूटचे फायदे एन लक्ष्मी सांगसांगतात की, आहारात ब्रेडफ्रूटचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात भरपूर प्रमाणात स्टार्च असते, जे शरीरात लवकर ऊर्जा भरते. यासोबतच यामध्ये असलेले फायबर पचनशक्ती वाढवते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेडफ्रूट रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो आणि वजनही नियंत्रणात राहते. ब्रेडफ्रूट अनेक प्रकारे खाल्ले जाते. ते शिजवूनही खाता येते आणि उकळल्यानंतरही खाता येते. हे ग्लूटेन फ्री आहे, त्यामुळे त्यापासून ग्लूटेन फ्री पीठ देखील बनवता येते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मर्यादित प्रमाणात वापरा ब्रेडफ्रूटचा पोत बटाट्यासारखा असतो, म्हणून ते कापल्यानंतर उकळले जाते. यानंतर ते ग्रील्ड किंवा पॅनमध्ये शिजवले जाऊ शकते. त्याची करीही बनवता येते. मात्र त्यात भरपूर फायबर असते, म्हणून ते कमी प्रमाणात सेवन करणे फायदेशीर आहे. ब्रेडफ्रूटच्या त्वचेमध्ये भरपूर लेटेक्स असते, त्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामध्ये भरपूर स्टार्च असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Summer Tips : उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर रामबाण उपाय आहे हे पीठ! शरीराला मिळेल थंडावा

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात