जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu: मेन गेटपासून स्वयंपाक घरापर्यंत या छोट्या चुका करतात मोठं नुकसान; आजपासूनच बदला या सवयी

Vastu: मेन गेटपासून स्वयंपाक घरापर्यंत या छोट्या चुका करतात मोठं नुकसान; आजपासूनच बदला या सवयी

5. वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तू तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवणे निषिद्ध मानले जाते.

5. वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तू तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवणे निषिद्ध मानले जाते.

मुख्य गेटपासून ते स्वयंपाकघर, बेडरूम, स्नानगृह आदी सर्व काही वास्तुशास्त्राच्या (Vastushastra) नियमांनुसार बनवावं. याशिवाय या स्थानांच्या देखभालीबाबत वास्तुशास्त्रात काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 मार्च : घर बांधण्यासाठी आणि खरेदी करताना वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. त्यांचं पालन न केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळं घराच्या मुख्य गेटपासून ते स्वयंपाकघर, बेडरूम, स्नानगृह आदी सर्व काही वास्तुशास्त्राच्या (Vastushastra) नियमांनुसार बनवावं. याशिवाय या स्थानांच्या देखभालीबाबत वास्तुशास्त्रात काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात (Vastu Tips) ठेवायला हव्यात. या चुका घरात कधीही करू नका झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, घराच्या मुख्य दरवाजावर कधीही कचराकुंडी ठेवू नका. असं केल्यानं लक्ष्मी देवता नाराज होऊ शकते. ही जागा नेहमी स्वच्छ ठेवा आणि तिथं पुरेसा प्रकाश ठेवा. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजावर नेम प्लेट लावणं चांगलं मानलं जातं. पण काळी नेमप्लेट कधीही लावू नका. दर शनिवारी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानं घरात सुख-समृद्धी नांदते. हे वाचा -  शरीरातील नसांचं कार्य सुरळीत ठेवतात या 5 गोष्टी; आहारात घ्यायला विसरू नका शूज आणि चप्पल बेडरूममध्ये ठेवू नका. असं केल्यानं जीवनातील तणाव वाढतो. त्याऐवजी बेडरूममध्ये फुलांचे फोटो लावा. तिथं हलकं संगीत लावणंही चांगलं ठरेल. स्वयंपाकघर ही अशी जागा असावी, जिथं सूर्यप्रकाश यायलाच हवा. याशिवाय स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा आणि वस्तू व्यवस्थित ठेवा. पूजाघरात पूजा करताना स्वयंपाकघरातही उदबत्ती अवश्य ओवाळावी. हे वाचा -  Hair Care Tips: अनेक उपाय करूनही केसांची वाढ होत नाही, ही कारणं एकदा तपासा बाथरुमच्या वास्तूमध्ये गडबड झाल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळं बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. तसंच, पाण्याचा अपव्यय टाळावा. नळामधून पाणी गळत असल्यास, ते त्वरित दुरुस्त करा. या छोट्याशा त्रासामुळं मोठी धनहानी होते आणि मान-सन्मान हानी होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्रावर माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात