पावसाचे थेंब पकडण्यासाठी धडपड; निरागस मुक्या जिवाचा VIDEO VIRAL

पावसाचे थेंब पकडण्यासाठी धडपड; निरागस मुक्या जिवाचा VIDEO VIRAL

पाऊस पडू लागला की सामान्यपणे पशू-पक्षी आडोसा घेण्यासाठी धावतात.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : पावसात (Rain) खेळायला प्रत्येकाला आवडतं. आपण कितीही मोठे झालो तरी पावसाचे टपटप पडणारे थेंब (raindrop) आपल्या हातात पकडण्याचा प्रयत्न आजही आपण करतो. पण कधी कोणत्या प्राण्याला असं करताना पाहिलं आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (socia media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये एका कुत्रा (dog) आपल्या तोंडात पावसाचे थेंब घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

पाऊस पडला की आनंदात मोर थुईथुई नाचतो. मोराला पावसात भिजताना तुम्ही पाहिलं असेल. पण सामान्यपणे इतर पशू-पक्षी पाऊस पडताच धूम ठोकतात. पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधतात. पण सध्या सोशल मीडियावर अशा कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पावसात भिजतो आहे. इतकंच नव्हे तर पावसाचे थेंब तोंडात पकडण्याचा प्रयत्न करतो आहे.

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, धो धो पाऊस पडतो आहे आणि हा कुत्रा आपल्या दोन पायांवर उभा राहून तोंड वर करून पावसाचे थेंब तोंडात पकडण्यासाठी धडपड करतो आहे.

कदाचित या कुत्र्याला तहान लागली असावी किंवा त्याला पावसाचे थेंब असं पकडणं आवडत असावं. कारण काहीही असलं तरी या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ पाहताच बहुतेक नेटिझन्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

हे वाचा - आईच्या मायेला तोड नाहीच! कुशीत घेऊन कुत्र्यानं मांजराला पाजलं दूध; VIDEO VIRAL

खरंतर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपल्या लहानपणाचीही आठवण झाली असेल. तोंड उघडं करून तोंडात पाणी पकडण्याचा असा प्रयोग कधी ना कधी प्रत्येकानं एकदा तरी केला असेलच. या व्हिडीओतून आणखी एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे पाण्याचं महत्त्वं. थेंब थेंब पाणी पकडण्यासाठी हा मुका जीव असा धडपडतो आहे. त्यामुळे त्यालाही पाण्याचं महत्त्वं किती आहे हे समजतं.

Published by: Priya Lad
First published: January 27, 2021, 11:41 AM IST

ताज्या बातम्या