नवी दिल्ली, 28 डिसेंबर: मानवी शरीराची ( human body) रचना अत्यंत गुंतागुंतीची आणि अद्भुत आहे. यावर अनेक वर्षांपासून संशोधन होत आहे. मानवी शरीरातल्या एका नव्या अवयवाचा ( organ) शोध नुकताच लागलाय. मेडिकल सायन्समधलं ( medical science) हे मोठं यश असून, हा अवयव आपल्या तोंडाच्या खालच्या जबड्याच्या मागच्या बाजूला आढळला आहे. त्याच्या मदतीने आपल्याला जबडा हलवता येतो. 'एबीपी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हिरव्या मिरच्या चिरल्यामुळे तळहातांची जळजळ होतेय? या घरगुती उपायामुळे होईल त्रास कमी
मानवी शरीरातील एक नवीन अवयवाचा शास्त्रज्ञांनी शोध लावलाय. या अवयवाला 'मॅसेटर' (Masseter) असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या तोंडाच्या खालच्या जबड्याच्या हालचालीस मदत करणं, हे या अवयवाचं मुख्य कार्य आहे. अॅनल्स ऑफ अॅनाटॉमी ( Annals of Anatomy) या जर्नलमध्ये नवीन अवयवाच्या शोधाबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी 12 मृत व्यक्तींच्या डोक्याच्या रचनेचा सखोल अभ्यास केला. 16 मृत व्यक्तींच्या डोक्याचे सिटी स्कॅन ( CT Scan) केलं. तसंच जिवंत माणसांच्या जबड्यांचं एमआरआय ( MRI) करण्यात आलं.
सध्या, या नवीन अवयवाला मस्कुलस मॅसेटर पार्स कोरिनिडिया असं नाव देण्यात आलंय. मॅसेटरचा कोरोनॉइड भाग असा त्याचा अर्थ होतो. हा शोध शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मानवी शरीराबद्दल अधिक अभ्यास करण्यासाठी या संशोधनाची त्यांना मदत होणार आहे. या माहितीमुळे भविष्यात डॉक्टर अधिक चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया करू शकतील.
जबड्याच्या मागील भागात नवीन अवयव सापडला असून, जबड्याच्या मागील बाजूस मॅसेटरमध्ये खोल थर आढळून आला आहे. तो तिथे आढळणाऱ्या इतर दोन थरांपेक्षा वेगळा आहे. सध्या हा स्नायू हाडासारखा दिसतो. याचं कारण म्हणजे आजूबाजूला चीक्स बोन्स (गालाची हाडं) आहेत. कानाजवळ समोरच्या भागात हा अवयव आढळतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
स्वित्झर्लंडमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये बायोमेडिसिन विभागात सीनिअर लेक्चरर आणि या संशोधनाच्या प्रमुख संशोधनकर्त्या झिल्व्हिया मॅजी यांनी सांगितलं, की 'जेव्हा आम्ही मॅसेटर अवयवाचं डिसेक्शन केलं तेव्हा तिन्ही स्तर स्पष्टपणे दिसू लागले. दोन वरच्या बाजूला आणि तिसरा आतल्या बाजूला. हा अवयव खालचा जबडा हलविण्यास मदत करतो.'
हाडासारख्या दिसणाऱ्या या अवयवाचा सविस्तर अभ्यास यापूर्वी कधीही झाला नव्हता. हा अवयव आपल्या तोंडाच्या खालच्या जबड्याच्या शेवटी आढळलाय. या नव्या संशोधनामुळे मानवी शरीरावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मदत होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Human face, Lifestyle