Home /News /lifestyle /

'निगेटिव्ह सेल्फ टॉक' मानसिक आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या यातून कसं मुक्त व्हाल

'निगेटिव्ह सेल्फ टॉक' मानसिक आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या यातून कसं मुक्त व्हाल

एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे गंभीर आणि टीकात्मक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करतो आणि ही टीका नेहमी नकारात्मक स्वरुपाची असते. अपयशी होण्याची भीती हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून आत्मविश्वास वाढवण्यासाठी टीकात्मक विचार सतत ऐकणार नाही किंवा टीका करणार नाही याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : निरोगी शरीरासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी नकारात्मक विचारातून मुक्त होण्याची गरज आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी जितकं शरीराने तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे, तितकंच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही जितके मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहात तितकी तुमची लाईफस्टाईल उत्तम होईल. म्हणूनच, आपल्या मानसिक आरोग्यावर शारीरिक आरोग्याइतकंच लक्ष दिलं पाहिजे. काय असतं निगेटिव्ह सेल्फ टॉक - अनेकदा अनेकांना अनेक प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागतं. कधी आपण एखाद्यावर टीका करतो, कधी आपण ही टीका ऐकतो. पण एखाद्याने सतत टीका ऐकणं हेदेखील समस्या निर्माण करणारं असू शकतं. निगेटिव्ह सेल्फ टॉकबद्दल बोलायचं, तर यात एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे गंभीर आणि टीकात्मक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करतो आणि ही टीका नेहमी नकारात्मक स्वरुपाची असते. अपयशी होण्याची भीती हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून आत्मविश्वास वाढवण्यासाठी टीकात्मक विचार सतत ऐकणार नाही किंवा टीका करणार नाही याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. निगेटिव्ह सेल्फ टॉकची उदाहरणं - निगेटिव्ह सेल्फ टॉक ओळखणं नेहमीच कठीण असतं, कारण याचे असे बरेच मार्ग आहेत जे कोणालाही समजलेले नाहीत. जेव्हा आपण स्वतःला म्हणतो, 'मी या कामात चांगला नाही, म्हणून मी हे काम करू नये' तर यातूनही एकप्रकारे नकारात्मक विचार निर्माण होतात. पेपर कपमध्ये चहा पिणं इकोफ्रेंडली असेलही, पण आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक अशाप्रकारे नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हा - सुरवातीला त्यातून मुक्त होणं सोपं नाही. परंतु सतत प्रयत्नांनी आपली त्यातून सुटका होऊ शकते. सर्व प्रथम, अशा नकारात्मक विचारांना ओळखायला शिका आणि त्याकडे दुर्लक्ष करा. थोडा वेळ देऊन विचार केलात, तर तुम्हाला या नकारात्मक गोष्टींचा सामना करण्याची कल्पना सुचेल कारण आपणच आपली विचारसरणी उत्तम पद्धतीने समजू शकतो. काही ट्रिक जाणून घ्या ज्या तुम्हाला नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरतील : 1. स्वतःला मित्राप्रमाणे वागवा जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा स्वत:ला मित्राप्रमाणे सल्ला देण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत आपण आपल्या मित्राला कोणता सल्ला द्याल, तोच उपाय स्वतःवर लागू करण्याचा प्रयत्न करा. आपण याबद्दल आपल्या कोणत्याही मित्रांकडून सल्ला घेऊ शकता. 2. आपल्यातील निगेटीव्हीटी ओळखा आपल्यातील निगेटीव्हीटी ओळखणं ही ती दूर करण्यासाठीची पहिली पायरी आहे. बर्‍याचदा आपला नकारात्मक विचार करण्याचा पॅटर्न एकसारखाच असतो. आपण अनेकदा कुठल्याही गोष्टीला एकाच पद्धतीने नकार देत असतो. म्हणून स्वतःला समजून घेणं, स्वतःला जाणून घेणं आणि मग आपल्यातील निगेटीव्हीटी दूर करणं महत्वाचं आहे. 3. जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करता तेव्हा स्वतःशी बोला जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येतात, तेव्हा तुम्ही तुमच्याशी बोला. स्वतःला समजवून सांगा की, हे खरं नाही फक्त मनातील कल्पना, विचार आहेत. हे वास्तव नाही आणि आपण त्या नकारात्मकतेशी लढण्यास सक्षम आहात. सुरुवातीला ही पद्धत थोडी विचित्र वाटेल, परंतु जर ती काम करत राहिली, तर आपल्या मनातून नकारात्मकता दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग बनू शकतो. 4. लेखन सुरू करा जर कोणतीही पद्धत काम करत नसेल किंवा नकारात्मक विचारांपासून सुटका होत नसेल, तर आपले सर्व नकारात्मक विचार कागदावर लिहा. तुम्ही लिहून तुमच्या मनात साचलेले विचार व्यक्त केल्यामुळे मन हलकं होतं. पण एक अत्यंत महत्त्वाची काळजी घ्या, या लिखाणात दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही लिहिलं असेल तर ते लिखाण कुणाच्या हाताला लागणार नाही हे बघा. तसं न जमल्यास लिहिलेली पानं फाडून किंवा जाळून नष्ट करा. 5. स्वतःशी सकारात्मक बोलायला सुरुवात करा जेव्हा आपण गोष्टींबद्दल सकारात्मक विचार करण्यास प्रारंभ करता, तेव्हाच निगेटीव्हीटी संपेल. स्वत:ला प्रवृत्त करा, स्वत:ला खात्री द्या की आपण जे जे काम करत आहात किंवा जे करणार आहात त्यामध्ये नक्कीच आपण यशस्वी व्हाल.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Health, Positive thinking

    पुढील बातम्या