हिरड्या आणि नाकातून होणारा रक्तस्राव थांबवण्यास उपयुक्त आहे डाळिंब

हिरड्या आणि नाकातून होणारा रक्तस्राव थांबवण्यास उपयुक्त आहे डाळिंब

डाळिंबाचे (pomegranate) दाणे, पानं, फूल आणि साल आरोग्यासाठी विविध समस्यांवर फायदेशीर आहे.

  • Last Updated: Sep 23, 2020 07:44 PM IST
  • Share this:

एखादी व्यक्ती आजारी असल्यावर तिला डाळिंब दिलं जातं, हे आपल्याला माहितीच आहे. डाळिंबामध्ये भरपूर लोह असतं, ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आजारी व्यक्तींमध्ये लोहाचे प्रमाण कमी होतं, म्हणून त्यांना डाळिंब दिलं जातं. याव्यतिरिक्त, डाळिंबाच्या दाण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, टॅनिन, जीवनसत्त्वे असतात. डाळिंबाचे दाणे, पानं, मूळ, फुलं आणि साल यांना आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे. या सगळ्यांचा उपयोग विविध आजारांवर केला जातो.

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, डाळिंबाची पानं पोटदुखी, निद्रानाश, एक्झिमा, तोंडाचा अल्सर अशा अनेक आजारांना बरे करतात. डाळिंब शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर कसे आहे ते जाणून घेऊया.

डाळिंबाची फुलं पायरोरिया रोगासाठी फायदेशीर

दातातून रक्तस्त्राव होत असेल तर या समस्येला पायरोरिया म्हणतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी डाळिंबाची वाळलेली फुलं बारीक करा. ही पावडर दिवसातून 2 वेळा वापरावी. दातातून रक्तस्त्राव थांबेल आणि दातही मजबूत होतील.

नाकातून रक्तस्रावाच्या समस्येवरही फायदेशीर

नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या असल्यास नाकात डाळिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यानंतर काही वेळानं नाकातून येणारा रक्तस्राव थांबेल. बहुतेकवेळा ही समस्या  उन्हाळ्याच्या ऋतुत उद्भवते. डाळिंब वास्तविक थंड आहे, यामुळे शरीराची उष्णता कमी होते.

हे वाचा- घशात खवखव; अगदी घरच्या घरी फक्त 5 उपायांनी मिळवा आराम

पोटदुखी साठी औषधुपचार

डाळिंबाची दाणे पोटदुखीसाठी प्रभावी आहेत. पोटाच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी मीठ, मिरपूड पावडर आणि डाळिंबाच्या बिया मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे पोटदुखीची समस्या दूर होईल

भूक वाढवण्यासाठी आणि अन्नास पचवण्यासाठी औषधी

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते भूक फारच कमी लागणे किंवा पचनाची समस्या असल्यास डाळिंबाचे दाणे खूप फायदेशीर असतात. भूक वाढवण्यासाठी, खारट मीठ, मिरपूड, जिरे, हिंग थोड्या प्रमाणात घेऊन पावडर तयार करुन घ्या. पचनक्रिया सुधारण्यासाठी, 3 चमचे डाळिंबाच्या रसात एक चमचा जिरे आणि गूळ मिसळा आणि जेवणानंतर खा. हे पचन सुधारेल आणि पचन संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करेल.

डाळिंबाची साल, पोटातील कृमींवर प्रभावी औषध

पोटातील कृमी दूर करण्यासाठी डाळिंबाच्या सालाचा वापर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. ही समस्या मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येते. यावर मात करण्यासाठी दिवसातून 3 वेळा वाळलेल्या डाळिंबाच्या सालीची एक चमचा पावडर द्या. यामुळे पोटातील कृमी दूर होतील. ही पावडर मूळव्याध दरम्यान किंवा मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव नियंत्रित करण्यात देखील फायदेशीर ठरेल.

हे वाचा- अँथ्रॅक्स हा आजार नेमका काय आहे? कशी घ्यावी काळजी

डाळिंबाची साले चेहर्याचे सौंदर्य वाढविण्यास मदत करतात

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाब पाण्यात डाळिंबाच्या वाळलेल्या सालीचे चूर्ण मिसळून लेप बनवा. हा लेप झोपण्याच्या वेळी नियमितपणे लावा आणि सकाळी चेहरा धुवा. हे चेहऱ्यावरील डाग, रेषा, सुरकुत्या ते दूर करेल.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – सकस आहार

न्यूज 18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुलं, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणं दिसत असतील तर, कृपया तात्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधं देऊ नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णतेवर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झालं तर त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 23, 2020, 7:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading