जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Foods For Lungs Health: फुप्फुसांच्या कार्यक्षमतेसाठी 6 पदार्थांचा आहारात करा समावेश

Foods For Lungs Health: फुप्फुसांच्या कार्यक्षमतेसाठी 6 पदार्थांचा आहारात करा समावेश

Foods For Lungs Health: फुप्फुसांच्या कार्यक्षमतेसाठी 6 पदार्थांचा आहारात करा समावेश

आजारांपासून दूर राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा ठरतो. फुफ्फुसं (Lungs) हा शरीरातला सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. श्वासोच्छ्वासाची संपूर्ण प्रक्रिया फुफ्फुसांवर अवलंबून असते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 18 जुलै : गेल्या काही वर्षांत जीवनशैली (Lifestyle) बदलल्याने अनेक गंभीर आजार (Disease) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा ठरतो. फुफ्फुसं (Lungs) हा शरीरातला सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. श्वासोच्छ्वासाची संपूर्ण प्रक्रिया फुफ्फुसांवर अवलंबून असते. सध्याच्या कोरोना काळात फुफ्फुसांचं आरोग्य विशेष चर्चेत आहे. न्यूमोनिया, कफ, कॅन्सर, कोरोना अशा विविध आजारांमुळे फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे पर्यावरण, आहार, जीवनशैली, व्यसनं या गोष्टींमुळेदेखील फुफ्फुसांची कार्यक्षमता (Capacity) कमी होऊ शकते. धूम्रपानामुळे (Smoking) तर फुफ्फुसांचं मोठं नुकसान होतं. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यसनं सोडणं, श्वसनाचे व्यायाम करणं आवश्यक आहे. तसंच आहारात (Diet) काही विशेष पदार्थांचा समावेश केला तर फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम राहू शकतं. `एनडीटीव्ही`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वाढत्या वयानुसार फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. आरोग्यासाठी फुफ्फुसं कार्यक्षम असणं गरजेचं आहे. आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजनमुळे (Oxygen) शरीरातल्या अवयवांचं काम सुरळीत राहतं. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली, तर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन घेतला जात नाही आणि त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. धूम्रपानामुळे फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो. धूम्रपानामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. धूम्रपानामुळे कॅन्सरसह अनेक आजार होतात. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवायची असेल, तर धूम्रपानासारखं व्यसन सोडणं आवश्यक आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. ग्रीन टी (Green Tea) किंवा कॉफीसारखी (Coffee) कॅफिनयुक्त पेयं फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या पदार्थांमध्ये अ‍ॅंटीऑक्सिडंट मुबलक असतात. त्यामुळे फुफ्फुसांसह शरीरातले विषयुक्त पदार्थ आणि सूक्ष्म कण बाहेर टाकण्यास मदत होते. हळद (Turmeric) बहुपयोगी आहे. हळदीत अ‍ॅंटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळद फुफ्फुसासाठी गुणकारी ठरते. हळदीमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. सफरचंदामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. सफरचंदं (Apple) धूम्रपानामुळे फुफ्फुसांची झालेली हानी कमी करतात. तथापि, सफरचंद खाल्ल्यामुळे धूम्रपानाचे परिणाम पूर्णपणे दूर होत नाहीत. त्यामुळे धूम्रपान तातडीनं सोडणं गरजेचं आहे. भोपळ्यामध्ये (Pumpkin) कॅरोटिनॉइड्स मुबलक असतात. भोपळ्यात झेक्सॅन्थिन, ल्युटीन, बीटा कॅरोटीनसारखी कॅरोटिनॉइड्स असतात. तसंच त्यात अ‍ॅंटीऑक्सिडंट आणि अ‍ॅंटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते. धूम्रपान करणाऱ्यांनादेखील भोपळ्याचा फायदा होऊ शकतो. मिरचीमध्ये (Chilli) व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सीमुळे फुफ्फुसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. मिरचीत अ‍ॅंटीऑक्सिडंट्स आणि पाण्यात विरघळणारे पोषक घटक असतात. हे घटक सिगारेटमध्ये आढळणाऱ्या, फुफ्फुसांची क्षमता कमी करणाऱ्या अनेक विषारी पदार्थांशी लढण्यास मदत करतात. लाल कोबी (Red Cabbage) ही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. त्यात अनेक पोषक तत्त्वं असतात. ही भाजी शिजवून अनेक पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे आहारात ही भाजी सहज समाविष्ट होऊ शकते. लाल कोबीत अ‍ॅंथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होण्यास प्रतिबंध होतो. या पदार्थांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसंच आरोग्यविषयक समस्या निर्माण होत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: coffee
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात