मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Solapur News : अस्सल सोलापुरी नॉनव्हेजसाठी 'इथं' भेट द्या, एकदा खाल तर बोटं चाखाल! Video

Solapur News : अस्सल सोलापुरी नॉनव्हेजसाठी 'इथं' भेट द्या, एकदा खाल तर बोटं चाखाल! Video

X
Solapur

Solapur News : अस्सल सोलापुरी नॉनव्हेज खायचं असेल तर या खानावळीत नक्की जायला हवं.

Solapur News : अस्सल सोलापुरी नॉनव्हेज खायचं असेल तर या खानावळीत नक्की जायला हवं.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur, India

  अनुराग सुतकर, प्रतिनिधी

  सोलापूर 18 मार्च :  महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांची एकजीव संस्कृती असलेलं शहर अशी सोलापूरची ओळख आहे. मराठी, कानडी आणि तेलुगु भाषिक नागरिकांप्रमाणेच विविध जाती धर्माचे नागरिक सोलापूरमध्ये सामावले आहेत. त्यांच्या विविध खाद्यपदार्थामुळे सोलापूरची खाद्यसंस्कृती श्रीमंत झालीय. येथील काळे मसाले चांगलेच फेमस आहेत. अगदी व्हेज भाजीत मसाले टाकले तर त्याला नॉनव्हेजच्या भाजीप्रमाणे चव येते.

  सोलापूरमध्ये सध्या भावसार कुटुंबीयांची आई हिंगोलीआंबिका भावसार खानवळ चांगलीच गाजत आहेत. किसन गर्जे हे या खानावळीचे मालक आहेत. त्यांनी सुरूवातीला कन्ना चौकात छोट्याशा गाडीवर नॉनव्हेजमधील विविध पदार्थांचा स्टॉल टाकला होता. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद लक्षात घेऊनच त्यांनी खानावळ सुरू केली.

  Video: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट!

  भावसार खानववळीमधील मटन जिगरी, मटन कलेजी, मटन मसाला, सुके मटन, खिमा उंडे आणि मेथी खिमा हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. स्वच्छ आणि ताजे मटन तसंच विशिष्ट प्रकारचे घरगुती काळे तिखट वापरुन इथं हे सर्व पदार्थ केले जातात. त्याचबरोबर ग्राहकांना सोलापूरची ओळख असलेली कडक भाकरीही देण्यात येते.

  गर्जे यांनी लॉकडाऊननंतर हा व्यवसाय सुरू केला. घरातील सर्वच व्यक्ती या खानावळीत काम करतात. गर्जे यांच्या पत्नी येथील विशेष डिश बनवतात. सोलापूरचे स्पेशल काळ्या तिखटातील मटन खाण्याची तुमची इच्छा असेल तर भावसार खानावळ नक्की ट्राय करा. इथं तुम्हाला मटन थाळी आणि स्पेशल मटन थाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

  First published:

  Tags: Local18, Local18 food, Solapur