धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 2 मार्च : भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते. कुठे आहे बाजार? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे. वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे. या बाजारात फळ,भाज्या,मसाले, खाद्य पदार्थ अनेक गोष्टी घाऊक दारात मिळतात. यापैकीच एक असलेलं मसाला मार्केट गेल्या 31 वर्षापासून सुरू आहे. तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकान आहे. काश्मीरी मिरची, मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची, जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबर, चिंच, इ प्रकारचे मसाले या बाजारात मिळतात. मुंबईतील ‘या’ मार्केटमध्ये लेडीज चप्पल मिळतात सर्वात स्वस्त, पाहा Video आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट मसाला व्यापारी अमरीश बरोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे. यामधील मसाला मार्केटला यंदा 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमरीश भाई 1980 पासून मसाला व्यवसायात काम करत आहेत. सुरूवातीला मोहम्मद अली रोडला मोठं मार्केट होतं. पण 1991 साली ते वाशीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्याच बरोबर मसाल्याचा दर हा दररोज चढता - उतरता असतो. डी - विभागात होलसेल तर ई - विभागात रिटेल असे दोन्ही प्रकारचे मसाले तुम्हाला इथं मिळतात.
‘कोरोना काळात खाद्यपदार्थांची विक्री थांबवू नका अशी आम्हाला सरकारनं विनंती केली होती. त्यावेळी आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं होत. आमचे अनेक व्यापारी मित्र, माथाडी कामगार यांना जीव गमावावा लागला. पण, आम्ही मागं हटलो नाही. मार्केट सुरू ठेवलं. कोरोनाकाळात आमचं खूप नुकसान झालं. पण, आता हळूहळू बाजारपेठ पुन्हा उभी राहात आहे,‘असं अमरिश भाई सांगतात.
गूगल मॅपवरून साभार