अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 16 मे : खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. सोलापूर शहरातील अनेक डिश या फेमस आहेत. सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी ही जगप्रसिद्ध आहे. सोलापूरची कडक भाकरी खाणे म्हणजे आत्मा तृप्त झाल्याची भावना निर्माण होते. शेंगा चटणी असू द्या किंवा कोणतीही नॉनव्हेज भाजी असू द्या सोलापूरकर हमखास कडक भाकरी सोबत ती खातो म्हणजे खातोच. अशीच खिमा आणि कडक भाकरी एक स्पेशल डिश सोलापुरातील एका कॅफेमध्ये मिळत आहे. या ठिकाणी खिमा आणि कडक भाकरी खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. सोलापुरातील नव्याने सुरू झालेले कॅफे हाइड इनमध्ये खिमा आणि कडक भाकरी खायला मिळते. या कॅफेचे मालक अभिषेक हिरेमठ आहेत. सर्वसाधारणपणे कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर, पास्ता किंवा अशा अनेक प्रकारचे फास्ट फूड येतात. परंतु सोलापुरातील या कॅफेमध्ये आपल्याला सोलापुरी स्टाईलने बनवलेले अनेक नॉनव्हेज शिवाय अनेक प्रकारचे व्हेज डिशेस खायला मिळतील. यामध्ये खिमा आणि कडक भाकरीचा समावेश आहे. खिमा आणि कडक भाकरीची किंमत 140 रुपये आहे.
खिमा कसा बनतो ? - प्रथम कांदा व्यवस्थित कट करून घ्यावा लागतो. - त्यानंतर मॅरीनेशनसाठी ठेवलेले चिकन बाहेर काढून व्यवस्थित चोपर्सच्या सहाय्याने चॉप्स करून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे लागते. - त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून कांदा व्यवस्थित परतून घ्यावा. त्यामध्ये आद्रक आणि लसूणची पेस्ट टाकावी. - कांदा थोडासा लालसर भाजल्यावर त्याच्यामध्ये बारीक केलेले चिकन टाकून घ्यावे. तेव्हा चवीनुसार मीठ आणि इतर मसाले आणि गरम मसाला बारीक करून टाकावा. - चिकनचा रंग थोडासा व्हाईट इस होत असला की समजून घ्यावे चिकन व्यवस्थित फ्राय होत आहे. - त्यानंतर गॅसची थोडीशी फ्लेम वाढवून त्यामध्ये सोलापुरी स्टाईलने बनवलेले लाल आणि काळे तिखट टाकून घ्यावे. - व्यवस्थित भाजून घेतल्यावर, दुसऱ्या गॅसवर थोडीशी फ्लेम छोटी ठेवून त्यावर भाकरी भाजून घ्यावी. - एका डिशमध्ये भाकर आणि त्यावर तयार झालेला चिकन खिमा टाकून सर्व्ह करावे. व्यापाऱ्यांनी केली निर्मिती, संपूर्ण जगात फेमस झाली सोलापूरची बाजार आमटी! पाहा Recipe Video पारंपारिक डिशेस सर्व्ह करत आहोत आमच्या कॅफेला जवळपास फॅमिली आणि तरुणांची ओढ जास्त असते. त्याचाच अभ्यास करून आम्ही सोलापुरी खाद्य संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने या आधुनिक कॅफे नावाच्या संकल्पनेतून सोलापूरचे पारंपारिक डिशेस आम्ही सर्व्ह करत आहोत आणि त्याचे आम्हाला समाधान आहे. खिमा आणि कडक भाकरीचा समावेश आहे, असं कॅफे हाइड इनचे मालक अभिषेक हिरेमठ सांगतात. कुठे आहे कॅफे? कॅफे हाइड इन WIT कॉलेज जवळ, साखर पेठ, सोलापूर, महाराष्ट्र 413006