मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रणरणत्या उन्हात पुणेकरांना मिळतोय रबडीचा थंडावा, कुठं? पाहा हा Video

रणरणत्या उन्हात पुणेकरांना मिळतोय रबडीचा थंडावा, कुठं? पाहा हा Video

X
उन्हाळ्यात

उन्हाळ्यात थंड पदार्थ खायची इच्छा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.

पुणेकरांना उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी एक नवीन जागा सुरू झालीय. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

प्रियांका माळी, प्रतिनिधी

पुणे, 22 मे : सध्या उन्हाळा सुरू असल्यानं थंड पदार्थांना चांगलीच मागणी आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात थंडगार पदार्थांचे स्पेशल पार्लर्स सुरू झासे आहेत. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, मस्तानी या सारखे वेगवेगळे पदार्थांच्या पार्लरमध्ये पुणेकर गर्दी करतायत. या खाद्य परंपेत आता आणखी एका पदार्थाची भर पडलीय. पुणेकरांना आता रबडी या थंडगार पदार्थाच्या एकापेक्षा जास्त फ्लेवर्स आनंद लुटता येणार आहे.

कशी झाली सुरूवात?

पुण्यामध्ये पहिल्यांदाच रबडीमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स देणारे खास रबडी हाऊस सुरू झाले आहे. 'राधा गोकुळ रबडी' असे या स्पेशल रबडी हाऊसचे नाव आहे.वाकडमध्ये मुख्य शाखा असलेल्या या रबडी हाऊसच्या खराडी, हिंजवडी आणि मांजरी येथे मिळून एकूण चार शाखा पुण्यामध्ये सुरू झाल्या आहेत.

महेश इथापे आणि श्रीकांत राठोड यांनी एकत्र येऊन हे रबडी हाऊस सुरू केलंय. राजस्थानमध्ये प्रवास करताना मला रबडीचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स पाहायला मिळाले. त्याच प्रकारचं आपणही काही तरी करावं या उद्देशानं आपण हा व्यवसाय सुरू केला, अशी माहिती इथापे यांनी दिली. आम्ही सुरूवातीला भोसरीमध्ये रबडी हाऊस सुरू केलं. त्याला अगदी कमी कालावधीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही पुण्यातील विविध भागांमध्ये ब्रँच सुरू केल्या.

झणझणीत, चुलीवरची आता विसरा, ही आहे आफ्रिकन मिसळ, कुठे मिळते? पाहा हा VIDEO

कोणते फ्लेवर्स उपलब्ध?

या रबडी हाऊसमध्ये सध्या सीताफळ, अंजीर,  लच्चा, प्लेन, गुलकंद, स्ट्रॉबेरी, मँगो अशा दमदार फ्लेवर्सची मजा अनुभवता येणार आहे. यांतील सीताफळ, प्लेन आणि अंजीर या फ्लेवर्सला ग्राहकांची खास पसंती मिळत आहे. ही रबडी कुल्हड या विशिष्ट प्रकारच्या भांड्यामध्ये सर्व्ह केली जाते. त्यामुळे रबडीला अधिक लज्जत प्राप्त होते. सध्याच्या रणरणत्या उन्हाळ्यात रबडीचं हवंहवंसं सुख तेसुद्धा अनोख्या फ्लेवर्समध्ये अनुभवण्याचा पर्याय सध्या पुणेकरांना मिळालाय.

गूगल मॅपवरून साभार

First published:
top videos

    Tags: Local18, Pune, Summer season