जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / झणझणीत, चुलीवरची आता विसरा, ही आहे आफ्रिकन मिसळ, कुठे मिळते? पाहा हा VIDEO

झणझणीत, चुलीवरची आता विसरा, ही आहे आफ्रिकन मिसळ, कुठे मिळते? पाहा हा VIDEO

आफ्रिकन पद्धतीची ही मिसळ खवय्यांनी नक्की ट्राय करायला हवी.

आफ्रिकन पद्धतीची ही मिसळ खवय्यांनी नक्की ट्राय करायला हवी.

पुण्याची मिसळ चांगली की नाशिकची हा वाद पुणेकरांमध्ये नेहमी रंगतो. त्यातच आता मिसळप्रेमींनी आफ्रिकन मिसळ हा नवा चॉईस मिळाला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 19 मे :  मराठी माणसांच्या आवडत्या पदार्थांमध्ये मिसळला मानाचं स्थान आहे. राज्यातील प्रत्येक शहरात एक खास मिसळ मिळते. खवय्यांचं शहर असलेल्या पुण्यात तर प्रत्येक भागात मिसळची हॉटेल आहेत. आपल्या हॉटेलमध्ये इतरांपेक्षा हटके आणि चविष्ट मिसळ देण्याचा हॉटेल चालकांचा प्रयत्न असतो. यामधूनच काही पुणेकर व्यावसायिक काही हटके ट्राय करत आहेत. पुणे शहरातील टिळक रोडवर आता चक्क आफ्रिकन मिसळ मिळतीय. या मिसळीची शहरात चांगलीच फेमस आहे. कुठं मिळते आफ्रिकन मिसळ? पुण्यातील टिळक रोडवर गेल्या दीड वर्षांपासून बाप्पा मिसळ हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ही आफ्रिकन मिसळ मिळते. ‘बनी चाव’ या आप्रिकन पदार्थापासून ही मिसळ बनवण्यात येते. त्यामुळे ती पुणेकरांमध्ये आफ्रिकन मिसळ म्हणून ओळखली जातेय. या हॉटेलचे मालक विवेक कुलकर्णी यांनी ही मिसळ कशी बनवले जाते याची रेसिपी सांगितली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कशी बनवतात आफ्रिकन मिसळ? ‘बनी चाव मिसळ बनवताना सुरवातीला एक मोठा ब्रेड असतो. त्याला कापून त्याचे तीन भाग करतात. त्या ब्रेडचा मध्यभाग ब्रेडच्या चौकोनी आकारात पूर्ण कट करून वेगळा केला जातो. त्यानंतर या ब्रेडच्या चारही बाजूला बटर लावून तो तव्यावर ग्रील केला जातो. त्या ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी, चिवडा, रस्सा, मग परत चिवडा आणि सर्व करताना वरती मटकी, कांदा आणि चीझ अस टाकून बनी चाव मिसळ बनविली जाते,’ असं कुलकर्णी यांनी सांगितलं. ‘आफ्रिकन पद्धतीच्या बनी चाव मिसळला पुणेकरांनी मोठी पसंती दिली आहे. ही मिसळ खाण्यासाठी अगदी पुण्याच्या बाहेरून लोक येत असतात,’ असं त्यांनी सांगितलं. पुण्यात फक्त 99 रुपयांना मिळते अनलिमिटेड मिसळ! पाहा खास Video बाप्पा मिसळमध्ये बनी चाव तर फेमस आहेच पण त्याचबरोबर इतरही नावाने आणि चावीने हटके असे पदार्थ पुणेकरांना चाखायला इथे मिळणार आहे. पैलवान वडा, स्पेशल मिसळ थाळी, मिसळ पिझ्झा आणि जैन मिसळ अशा प्रकारचे वेगवेगळे इनोवेटीव्ह प्रकार पहायला मिळतात, असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात