जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai News : आता बोला! आला चॅाकलेट ब्राउनी मोमो, पण व्हेज आहे की नॅान व्हेज?

Mumbai News : आता बोला! आला चॅाकलेट ब्राउनी मोमो, पण व्हेज आहे की नॅान व्हेज?

Mumbai News : आता बोला! आला चॅाकलेट ब्राउनी मोमो, पण व्हेज आहे की नॅान व्हेज?

मुंबईतील एका स्टॉलवर चॉकलेट ब्राउनी मोमो मिळत असून या स्टॉलवर खवय्यांची गर्दी असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लतिका अमोल तेजाळे, प्रतिनिधी मुंबई, 26 जून : मोमोज हे विशेषतः उत्तर भारतात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजची क्रेझ आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हा स्ट्रीट फूडचा प्रकार सर्वांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे मोमोजमध्ये अनेक फ्युजन प्रकार देखील मार्किटमध्ये उपलब्ध झाले आहेत. व्हेज आणि नॉनव्हेज असे अनेक पर्यायांबरोबर लोक आवडीने मोमोजचा आस्वाद घेत आहेत. मुंबईत ही रस्त्यावर ठिकठिकाणी मोमोजचे स्टॉल पहायला मिळतात. त्यापैकीच एका स्टॉलवर चॉकलेट ब्राउनी मोमो मिळत असून या स्टॉलवर खवय्यांची गर्दी असते. कुठे मिळतोय चॉकलेट ब्राउनी मोमो? मुलुंडच्या हॉली एंजेल्स हायस्कूलच्या परिसरात असलेले महाजन फूड कॉर्नर स्टॉलवर चॉकलेट ब्राउनी मोमो मिळतो. या स्टॉलच्या मालकीण अरुणा महाजन आहेत. या स्टॉलवर अनेक प्रकारचे फ्युजन मोमोज आणि बर्गर देखील मिळतात. येथील मोमोजचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बनणारे मोमोज हे क्लबस्टाइल मोमोज या पद्धतीने तयार केले जातात.

News18लोकमत
News18लोकमत

चॉकलेट ब्राउनी मोमोचे वैशिष्ट्ये काय? या चॉकलेट ब्राउनी मोमोमध्ये चॉकलेट ब्राउनी केकचे मिश्रण असते. ज्याचे बाहेरील कोटिंग हे तांदळाच्या पिठाचे केलेले असते. त्या मोमोला उकडून घेऊन त्याला चॉकलेट सिरप सोबत सर्व्ह केले जाते.

Solapur News : मुंबईच्या वडापावला सोलापूरची टक्कर, खास खर्डा चटणीही केली मिक्स; दुकानात लागल्या रांगा VIDEO

कोणते मिळतात मोमोज? महाजन फूड कॉर्नर व्हेजमध्ये माखानी ग्रेव्ही मोमो, अफगानी ग्रेव्ही मोमो, स्पिन्याच मोमो, पनीर पेरी पेरी मोमो, मशरूम मोमो, कॉर्न काप्सिकम मोमो, चिल्लीबर्स्ट, चॉकलेट ब्राउनी मोमो मिळतात. तर नॉन व्हेज मोमोजमध्ये क्लासिक चिकन, चिकन चिली, शेझ्वन, आचारी, मिंटी, कुरकुरे, तंदुरी, चिझमोमोज इत्यादी मोमोज मिळतात.  या मोमोजची किंमत 60 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे बर्गरसुद्धा या ठिकाणी मिळतात त्याची किंमत 60 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत आहे, असं अरुणा महाजन यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात