जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Solapur News : मुंबईच्या वडापावला सोलापूरची टक्कर, खास खर्डा चटणीही केली मिक्स; दुकानात लागल्या रांगा VIDEO

Solapur News : मुंबईच्या वडापावला सोलापूरची टक्कर, खास खर्डा चटणीही केली मिक्स; दुकानात लागल्या रांगा VIDEO

Solapur News : मुंबईच्या वडापावला सोलापूरची टक्कर, खास खर्डा चटणीही केली मिक्स; दुकानात लागल्या रांगा VIDEO

सोलापूरमधील हा वडापाव खाण्यासाठी दुकानात नेहमी रांगा लागलेल्या असतात.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी

सोलापूर 23 जून : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमध्ये वडापाव हा सर्वात फेमस पदार्थ म्हणून ओळखला जातो. रोजंदरीवर काम करणाऱ्या मजूरापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांनाच वडापाव आवडतो. मुंबई, पुणेसारख्या महानगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खायला मिळतात. सोलापूरमधील ‘हा’ खास वडापाव त्याच्या बनवण्याच्या पद्धतीमुळे शहरात चांगलाच फेमस आहे. काय आहे खासियत? <span class="" s1""="">सोलापुरातील <span class="" s1""="">ब्रह्मदेव <span class="" s1""="">दादा <span class="" s1""="">माने <span class="" s1""="">अभियांत्रिकी <span class="" s1""="">महाविद्यालयाच्या जवळ हा आरके वडापाव मिळतो. सर्वसामान्यपणे वडापाव बनवीत असताना तयार भाजी वापरून बटाटा एकत्रित करून त्याचे वडे बनवले जातात.  इथं तयार भाजी आणि बटाटा एकत्र करून वडे बनवले जातात. शिजवलेल्या बटाट्यामध्ये सोलापुरी खर्डा चटणी टाकून तो मिक्स केला जातो. त्यामुळे चटणीची खास चवही त्या वड्यामध्ये मिसळते.

जाहिरात

सुरुवातीला पाच रुपयांना मिळणारा वडापाव आता पंधरा रुपयाला झाला आहे. ‘आम्ही क्वालिटीआणि कॉन्टिटीमध्ये कोणतीही तडजोड करत नाही. आम्ही सुरूवातीला इतरांसारखाच वडापाव व्यवसाय सुरू केला होता. वडापाव तयार करण्याची आमची खास शैली आणि चव यामुळे तो सोलापूरमध्ये चांगलाच फेमस झालाय, अशी माहिती आर.के. वडापावचे मालक अर्जुन गायकवाड यांनी दिलीय.

News18लोकमत
News18लोकमत

25 पैशांना विकत होते वडापाव, आजही दुकानातून कुणी जात नाही उपाशी, VIDEO पाहून कराल कौतुक आत्तापर्यंत मी खाल्लेल्या वडापावपैकी हा सर्वात उत्तम क्वालिटीचा वडापाव आहे. याची टेस्ट देखील वेगळी आहे. सर्वांनी एकदा तरी हा वडापाव टेस्ट करावा, असं मी आवाहन करतो, असं येथील ग्राहक दत्तात्रय फडतरे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात