नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 25 मार्च : वडापाव हा बदलत्या काळात वेगानं लोकप्रिय होणारा पदार्थ आहे. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या नावाने वडापाव हा पदार्थ मिळतो. जालना शहरात मामाचा अस्सल कोल्हापुरी वडापाव या नावाने मिळणारा वडापाव चांगलाच ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. माफक दरात उत्तम चव मिळत असल्याने इथे ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते.
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
भूषण अहिरे यांनी मागील वर्षी नवरात्री (2022) मध्ये शहरातील मामा चौक परिसरात वडापाव विक्रीच्या व्यवसायला सुरुवात केली. मी सुरुवात केली तेव्हा अगदी कोल्हापुरी पदार्थाप्रमाणे अतिशय तिखट वडापाव देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या वडापावला मी मामाचा कोल्हापुरी वडापाव असं नाव दिले. या वडापावमध्ये तिखट पणा असल्यामुळे ग्राहकांना खायला आवडत आहे. यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं भूषण अहिर यांनी सांगितले.
काय आहे किंमत?
वड्यासाठी तयार केलेली बटाट्याची चिक्की ही अतिशय गोल असते. यासाठी साच्याचा वापर आम्ही करतो. तसेच वड्याबरोबर दिली जाणारी शेंगदाणा मिक्स चटणी लोकांना विशेष आवडते. वड्यासोबत दिल्या जाणाऱ्या मिरची वड्याचा ठसक्यामुळे चव आणखीनच वाढते. केवळ 10 रुपयात उत्तम चव असलेला हा वडापाव आम्ही ग्राहकांना देतो. दिवसाला 700 ते 800 वड्यांची विक्री होते. यातून आम्हाला दिवसाला 2 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. तर महिन्याला 50 हजाराचा निव्वळ नफा राहतो, असंही भूषण अहिर यांनी सांगितले.
भारी वडापाव कुठे मिळत नाही
इथे खूप छान वडापाव मिळतो. इथल्या वड्याची चव मस्त आहे. दुपारनंतर इथे खूप लोक नाश्ता करायला येतात. याची किंमत फक्त 10 रुपये आहे. 10 रुपयात एवढा भारी वडापाव कुठे मिळत नाही, असं ग्राहक सोहम यांनी सांगितले.
Success Story : कोरोना काळात दाखवलं धाडस, विसाव्या वर्षीच तरुण बनला लखपती! Video
मस्त वडापाव
मी जालन्यात आल्यापासून इथे वडापाव खायला येतो. खूप मस्त वडापाव हे देत आहेत आणि रेट पण एकदम स्वस्त आहे. 10 रुपयात इथे वडापाव मिळतो आणि तो पण गरम गरम वडापाव मिळतो, असं ग्राहक साक्षात अहिर यांनी सांगितले.
कुठे मिळतो वडापाव?
मामा चौक परिसर जालना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna, Local18, Local18 food, Vadapav