जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दिवसाला 400 ते 500 प्लेट होतात फस्त, नागपूरकर करतात एकच गर्दी

दिवसाला 400 ते 500 प्लेट होतात फस्त, नागपूरकर करतात एकच गर्दी

दिवसाला 400 ते 500 प्लेट होतात फस्त, नागपूरकर करतात एकच गर्दी

दिवसाला 400 ते 500 प्लेट होतात फस्त, नागपूरकर करतात एकच गर्दी

नागपूर अमरावती मार्गावर गेल्या 27 वर्षांपासून नाश्त्यासाठी एक ठिकाण प्रसिद्ध आहे. आपण येथील चव चाखलीत का?

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 27 जुलै: प्रत्येक शहरात अश्या काही जागा ठरलेल्या असतात की जिथल्या खाद्य पदार्थांमुळे त्या जागेला विशेष ओळख प्राप्त होत असते. अशीच काहीशी खास ओळख नागपूर -अमरावती या जुन्या महामार्गावर असलेल्या मोर्शी फाट्यावरील लहानुजी बाबा या हॉटेलने जपली आहे. इथे मिळणाऱ्या स्वादिष्ट चवीमुळे या महामार्गावरून जाणारा प्रवासी हमखास येथे थांबून नाश्ता करूनच पुढचा प्रवास करत असतो. नाष्ट्याची उत्तम चव, स्वच्छता आणि ग्राहकांचे आदरतिथ्य या त्रिसूत्रीमुळे हे खवय्यांचा आवडीचं ठिकाण झालंय. 27 वर्षांची परंपरा लहानुजी बाबा रिफ्रेशमेंट हे हॉटेल सागर खुरटकर यांच्या वडिलांनी सुरू केले. गेली 27 वर्षापासून सुरू असलेला त्यांचा हा व्यवसाय आजही लोकप्रियता टिकवून आहे. सध्या दिवसाला 400 ते 500 प्लेट नाश्त्याची ची विक्री होत आहे. आम्ही नाश्त्याची चव आणि गुणवत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासूनच ग्राहकांची गर्दी सुरू होते, असे खुरटकर सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

नाश्त्याला मोठी मागणी मुंबई कोलकत्ता अर्थात जुना नागपूर-अमरावती महामार्गावर मोर्शी फाट्याजवळ लहानुजी बाबा या नावाने हॉटेल आहे. आमच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मिळून सुरू केले होते. मुख्य महामार्गावर असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारा व्यक्ती येथे नाष्टा करून पुढचा प्रवास करत असतो. आमच्या नाश्त्याची चव आणि गुणवत्ता बघता एकदा इथून चव घेतलेला व्यक्ती नक्कीच समाधानी होत असतो, असे खुरटकर सांगातात. मस्त पाऊस पडतोय, घरी तयार करून पाहा दही धपाटे, अस्सल मराठवाडी स्टाईलने PHOTOS स्वच्छता, गुणवत्ता आणि उत्तम चव हे त्रिसूत्र आमच्या लहानुजी बाबा या हॉटेलमध्ये नाश्त्याचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यात सकाळच्या वेळी वैदर्भीय आलू गोंडा, पालक वडा, तर्री पोहा, मिसळ, भजे आदी पदार्थ मिळतात. तर दुपारी कचोरी, समोसा, सांबार वडा आणि शनिवार, गुरुवार, अशा विशेष उपवासाच्या दिवसाला साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, हे उपवासाचे पदार्थ मिळतात. यासोबतच आमच्या येथील मठ्ठा हा प्रसिद्ध आहे. आमच्या वडिलांनी दिलेला गुरु मंत्र म्हणजेच स्वच्छता, नाश्त्याची गुणवत्ता आणि ग्राहकांचे आदरातिथ्य यावर आम्ही आजही मार्गक्रमण करत आहोत. आमच्या येथे आज घडीला 12 लोक काम करत असून त्यातील 10 पुरुष तर 2 महिला आहेत, अशी माहिती या हॉटेलचे मालक सागर खुरटकर यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात