भाग्यश्री प्रधान आचार्य कल्याण, 15 मे : गुलाबजाम हा देशात सगळीकडं तयार होणारा आणि मोठ्या आवडीनं खाल्ला जाणारा गोड पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व गटातील व्यक्ती गुलाबजामच्या प्रेमात असतात. वाढदिवसापासून मंगल कार्यापर्यंत वेगवेगळ्या प्रसंगात गुलाबजामला मानाचं स्थान आहे. कल्याणमध्ये गुलामबजामची खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीत वेगवेगळ्या आकाराचे आणि चवीचे गुलाबजाम मिळतात. ठाणे जिल्ह्यात हे गुलाबजाम चांगलेच प्रसिद्ध आहेत. काय आहे वैशिष्ट्य? कल्याण स्टेशन जवळच्या शितला देवी मंदिरामागे असलेल्या या गल्लीत तुम्ही आलात की गुलाबजामचा घमघमाट आपसूकच येतो. समोरच झाकून ठेवलेले गुलाबजामचे ड्रम तुमचे लक्ष सहज वेधून घेतात आणि तुमची भूक चाळवली जाते.
दूध आणि मैदा वापरुन या गल्लीत वेगवेगळे गुलाबजाम केले जातात. यामध्ये हरियाला मावा जामून, हरियाली मावा जामून, साधा मावा, गोल्डन मावा लंबा जामून , काला स्पेशल जामून, इलायची जामून , जंबो काला जामून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार तुपात तळले जातात. प्रत्येकाचा आकार आणि चवीत फरक आहे. 150 प्रकारचे डोसे आणि मेदूवडा-सँडविच विकणारा बिट्टू, Video या खाऊ गल्लीत मिळणारा एक जम्बो गुलाबजाम खाल्ला तरी पोट तुप्त होतं. पण, तेवढ्यावरच समाधान होणं अवघड आहे. त्यामुळे आपण एकापेक्षा जास्त गुलाबजाम सहज गट्टम करतो. 6 ते 50 रुपयांपर्यंत एक गुलाबजाम मिळतो. यामधील कालाजाममध्ये पिस्त्याचा वापर केला जातो, अशी माहिती दुकानदारानं दिली. हे सर्व गुलाबजाम कल्याणजवळच्या बापगावजवळ बनवले जातात. आम्ही रोज जवळपास 10 हजार गुलाबजाम बनवतो, अशी माहिती पायल दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं दिली. किती आहे किंमत? स्पेशल पिस्ता काला जाम - 15 रुपये एक नग जंबो मावा काला जाम - 72 रुपये डझन स्पेशल जंबो मावा काला जाम - 84 रुपये डझन स्पेशल पिवर काला जाम -144 रुपये डझन स्पेशल जंबो इलायची जामून - 60 रुपये डझन गोल्डन मावा लांब जाम - 72 रुपये डझन कुठे खाणार गुलाबजाम? - झुंजारराव मार्केट शितलामाता मंदिरामागे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण (पश्चिम) वेळ - सकाळी 11 ते रात्री 10.30