मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mutton Vade : वीकेंडला ट्राय करा कोकणी पद्धतीचे मटण वडे! पाहा Recipe Video

Mutton Vade : वीकेंडला ट्राय करा कोकणी पद्धतीचे मटण वडे! पाहा Recipe Video

X
Mutton

Mutton Vade : वीकेंडला काही स्पेशल पदार्थ बनवण्याचा तुमचा बेत असेल तर कोकणी पद्धतीचे मटण वडे हा बेस्ट ऑप्शन आहे.

Mutton Vade : वीकेंडला काही स्पेशल पदार्थ बनवण्याचा तुमचा बेत असेल तर कोकणी पद्धतीचे मटण वडे हा बेस्ट ऑप्शन आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Pune, India

  !नीलम कराळे, प्रतिनिधी

  पुणे, 24 फेब्रुवारी : कोकणातील खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आहे. विशेषत: मासे खाण्यासाठी तर जगभरातील पर्यटक कोकणात येतात. कोकणातील मटणवडे हा देखील प्रकार चांगलाच प्रसिद्ध आहे. पण, तो अनेकांना चांगल्या पद्धतीनं करायला जमत नाही. हे वडे कसे करावे याबाबत पुण्यातील रंजना नलावडे यांनी आपल्याला काही टिप्स दिल्या आहेत. त्या टिप्स वापरून तुम्हीही हे वडे करू शकता.

  मटण वड्याचे साहित्य

  मटण वडे म्हंटलं की हे नॉनव्हेज आहेत, असा अनेकांचा समज होतो. पण, हे शाकाहारी आहेत. याचा आकार आणि ते प्रामुख्यानं चिकन आणि मटण सोबत खाल्ले जात असल्यानं याला मटण वडे हे नाव पडले आहे. हे वडे करण्यासाठी सर्वप्रथम  एक किलो तांदूळ धुऊन घ्यावेत.

  त्यानंतर या वड्यात  वाटी ज्वारी, 1 वाटी गहू, 15 काळी मिरी, 3 चमचे धने, 1 चमचा बडीशोप आणि अर्धी वाटी उडीद हे साहित्य एकत्र मिक्स करून जाडसर पद्धतीनं दळून घ्यावं.  हे पीठ तयार झाल्यावर आपण आता गव्हाच्या पिठासारखे हे मळून घ्यावे. हे मळताना जरा घट्टसर मळावे.

  कोल्हापूरला 'याड' लावणारं हुरड्याचं थालीपीठ कसं करतात? पाहा Recipe Video

  पीठ मळून झाल्यावरती त्या पिठामध्ये एक खोलगट खड्डा करावा आणि त्या खड्ड्यांमध्ये जळणारा कोळसा आणि पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून त्या कोळशावरती टाकाव्या. त्यावर थोडेसं तेल टाकून लगेच त्या पिठावरती मोठे झाकण ठेवावे. हा स्मोक त्या पिठामध्ये मुरेपर्यंत 15 ते 20 मिनिटे थांबावं. त्यानंतर दुसरीकडं गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवावे.

  वडे करण्याची कृती

  पिठाला स्मोक लागल्यानंतर हे पीठ आपण आता वडे करण्यासाठी वापरू शकतो. यासाठी आपल्याला लिंबाएवढे आकाराचे पिठाचे गोळे करून घ्यावेत.  एका प्लास्टिकच्या पिशवीवर पाण्याचा हात लावून हे वडे थापून घ्यावे. पाण्याचा हात लावून सैलसर असे वडे थापावेत.  या वडाच्या सर्व किनारी पातळसर थापाव्या. यामध्ये छोटेसे होल करून हे वडे तेलामध्ये सोडावेत.

  या वड्यांना तेल तुलनेनं कमीच लागते दोन्ही बाजूने हे वडे तेलात सोडल्यावर दोन्ही बाजूनी ब्राऊन होईपर्यंत तळावेत. हे वडे तेलात सोडल्यावर एकदम टम्म फुगतात. टम्म फुगलेले वडे म्हणजे तुमचे वडे व्यवस्थित झाले याचा अर्थ असा होतो. हे टम्म फुगलेले वडे मग तुम्ही तेलातून काढून बाजूला ठेवावेत आणि त्यानंतर हे तुम्ही मटणासोबत किंवा शाकाहारी लोक इतर रस्सा भाजी सोबत खाऊ शकता.  या वड्यांची टेस्ट अतिशय विशिष्ट असते. त्याला स्मोक दिल्यामुळे हे वडे आणखी लज्जतदार बनतात.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Local18 food, Pune, Recipie