ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 18 एप्रिल: उद्योग व्यवसायामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक महिलांनी यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे. अशी अनेक उदाहरणे सर्वांसमोर आहेत. याच महिलांचा आदर्श घेऊन लातूरमधील प्रीतम जाधव या महिलेने 56 प्रकारच्या लोणच्याची सुगरण या नावाने सुरुवात केली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दररोजच्या जेवणात विविध चटण्या लोणचे यांचा वापर केला जातो. ही गरज लक्षात घेऊन प्रीतम जाधव यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. लातूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या लोणच्याची मागणी आहे. 56 प्रकारची लोणचे प्रीतम जाधव यांना स्वयंपाकाची आवड आहे. त्यांनी घरात नवनवीन पदार्थ बनवत लोणच्याचे प्रयोग केले. तब्बल 56 प्रकारचे लोणचे बनवता येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
या लोणच्याला मोठी मागणी जाधव या सर्व लोणची पारंपरिक पद्धतीने बनवतात. त्यामुळे त्यांच्या लोणच्याला बाजारात मोठी मागणी आहे. आवळा, ओली हळद, लसूण, कैरी, लिंबाचे लोणचे, उपवासाची लोणचे या लोणच्याची मागणी बाजारात जास्त प्रमाणात होते. लोणची बनवण्याची पद्धत बाजारपेठेत जे लोणचे मिळते त्यात प्रेझेंटिव्ह रसायने रंग वापरले जातात. पण प्रीतम जाधव नैसर्गिक पद्धतीने लोणचे तयार करतात. त्यात रसायने वापरायचे नाहीत असा निश्चिय करून त्यांनी हा व्यवसाय करण्याचे ठरवले. योग्य प्रमाणात मीठ तिखट व मसाला याचे मिश्रण करून त्यामध्ये वापरले. तर घाण्यामधून गाळून आणलेले तेल वापरले जाते. यामुळे मिश्रित तेलाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने गाळप केलेले तेल वापरले जाते. चॉकलेट ते पेरूपर्यंत ‘इथं’ मिळतात 15 प्रकारच्या शेवया, पारंपारिक व्यवसायातून महिला करतेय लाखोंची कमाई, Video महिलांनी गृह उद्योगाची सुरुवात करावी कोरोना काळामध्ये संपूर्ण जगभरातील उद्योग व्यवसाय बंद पडत चालले असताना प्रीतम जाधव यांनी हा व्यवसाय सुरू केला. इतर लोणच्याच्या तुलनेत समाजातील सर्व वर्गाचा विचार करून 56 प्रकारचे लोणचे सुगरण या नावाने मार्केटमध्ये आणली. त्यांनी स्वतः सोबत अनेक महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा यशस्वी प्रयोग केला. महिलांनी गृह उद्योगांमधून दरमहा आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाची सुरुवात करावी व स्वावलंबी जीवन जगावे, असे आवाहन जाधव यांनी केले.

)







