मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Holi Puranpoli Video : डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळता; पुरणपोळी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत

Holi Puranpoli Video : डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळता; पुरणपोळी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत

पुरणपोळी

पुरणपोळी

पुरणपोळी बनवण्याच्या या पद्धती पाहिल्यानंतर तुम्हाला पुरणपोळी बनवणं वाटतं तितकं कठीण वाटणार नाही, उलट सोपं वाटेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 मार्च :  'होळी रे होळी पुरणाची पोळी', होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. पण पुरणपोळी बनवणं म्हणजे कित्येकांना खूप किचकट वाटतं. अगदी डाळ शिजवण्यापासून ते पोळी लाटण्यापर्यंत, थोडं जरी प्रमाण चुकलं तरी पुरणपोळी फसते. कधी पुरण फसतं, कधी लाटताना पुरणपोळी फाटते. तुम्हालाही पुरणपोळी बनवताना अशा बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा तुम्ही केला असेल. शिवाय पुरणपोळी बनवण्यात जाणारा वेळ तो वेगळाच. पण आता काहीच टेन्शन नाही डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळताही तुम्ही पुरणपोळी बनवू शकता, तेसुद्धा काही मिनिटात.

झटपट आणि सोप्या पद्धतीने परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. युट्यूबवर असलेल्या अशाच काही व्हिडीओपैकी मोजके व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. ज्यामुळे तुमचा सर्वत्र पुरणपोळी रेसिपी शोधण्याचा वेळही वाचेल. पुरणपोळी बनवण्याची अशी पद्धत तुम्ही आजवर पाहिली नसेल. अशीही पुरणपोळी बनवता येऊ शकते, असा विचारही तुम्ही केला नसेल. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, व्वा पुरणपोळी बनवणं इतकं सोपं आहे? चला पाहुयात कशी बनवायची पुरणपोळी?

Beed : हॉटेलात अस्सल पुरणपोळीचा प्रयोग ठरला हिट, महिलांचं बदललं आयुष्य, Video

पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं प्रमुख साहित्य

चणाडाळ किंवा बेसन

गूळ किंवा साखर

मैदा किंवा गव्हाचं पीठ

वेलची पूड

तेल किंवा तूप

खाली दाखवण्यात आलेल्या पुरणपोळीच्या वेगवेगळ्या रेसिपी व्हिडीओमध्ये साहित्य आणि त्याचं योग्य प्रमाणही देण्यात आलं आहे.

पुरण न वाटता पुरणपोळी

मधुरा मराठी रेसिपी युट्यूब चॅनेलवर पुरण न वाटता पुरणपोळी बनवण्यात आली आहे.

" isDesktop="true" id="843109" >

डाळ न शिजवता, पुरण न वाटता पुरणपोळी

" isDesktop="true" id="843109" >

डाळ न शिजवता, पुरण न वाटता, पीठ न मळता पुरणपोळी

" isDesktop="true" id="843109" >

आता यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने पुरणपोळी बनवून पाहा आणि कशी झाली ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या ओळखीतल्या लोकांना ही बातमी शेअर करून त्यांनाही सोप्या पुरणपोळीची रेसिपी द्यायला विसरू नका.

पोळी करताना काय काळजी घ्याल?

तुम्हाला पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या हव्या असतील तर तुम्ही मैद्याची पुरणपोळी करु शकता. याशिवाय मैदा आणि गव्हाची कणिक असे दोन्ही मिसळूनही तुम्हाला लुसलुशीत पुरणपोळी करता येईल.

मैदा घेत असाल तर तो अगदी हलक्या हाताने मळा. यासाठी थोडा वेळ लागेल. पण चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडासा वेळ घ्या.

पुरण सगळीकडे पसरण्यासाठी पोळ्या प्रेमाने आणि सावकाश लाटा. एका बाजूने पुरणपोळ्या लाटू नका.सगळीकडे समान दाब देऊन लाटा.

पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवा. तव्यावर पोळी भाजतेवेळी ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजा.

पुरणपोळी झाल्यावर ती डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवू नका. ती एखाद्या कागदावर गार होऊ द्या. त्यानंतर त्या पोळ्या डब्यात भरा.

पुरणपोळ्या  नरम राहाव्यात म्हणून त्यावर तूपाची धार सोडा.

First published:
top videos

    Tags: Food, Holi 2023, Lifestyle, Recipie