जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Poha Day : इंदुरचे प्रसिद्ध पोहे मुंबईत खायचे आहेत? 'या' ठिकाणी संपेल तुमचा शोध, पाहा Video

World Poha Day : इंदुरचे प्रसिद्ध पोहे मुंबईत खायचे आहेत? 'या' ठिकाणी संपेल तुमचा शोध, पाहा Video

जागतिक पोहे दिन

जागतिक पोहे दिन

World Poha Day : आंतरराष्ट्रीय पोहे दिनानिमित्त मुंबईतील एका भन्नाट पोहे स्टॉलची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 7 जून :  मुंबईचे नाव घेतले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गर्दी, कायम भरलेली ट्रेन आणि मुंबईत मिळणारे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ. मुंबईमध्ये कधीच कोणी उपाशी राहात नाही असं म्हणतात. इथं येणारा प्रत्येक माणूस आपलं पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करतच असतो. मुळचे इंदूरचे असलेले मात्र कामानिमित्त मुंबईत वास्तव्यात असलेले दिनेश पवार यांनी मुंबईत नुकताच इंदुरी चाट व्यवसाय सुरू केला आहे. जो अगदी कमी कालावधीमध्ये फेमस झाला आहे. आज (7 जून) आंतरराष्ट्रीय पोहे दिन आहे. त्या निमित्तानं पाहूया स्पेशल रिपोर्ट काय आहे खासियत? मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर तेथील खाद्यपदार्थांसाठी फेमस आहे. विशेषत: येथील पोहे आणि जिलेबी हे पदार्थ संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. अनेक पर्यटक या फेमस पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इंदूरला जात असतात. आता मुंबईकरांना या पदार्थांची अस्सल चव आपल्याच शहरात चाखायला मिळणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दिनेश पवार यांनी थ्रीडी ॲनिमेशन या क्षेत्रात शिक्षण घेऊन अनेक कंपन्यांमध्ये कामही केलंय. स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या मदतीनं माटुंग्यात इंदुरी पदार्थांचा स्टॉल सुरू केला. त्यांच्या या स्टॉलवर इंदुरी चाट, दही टिक्की चाट, इंदुरी पोहे, दही भल्ला, दही भेल, समोसा चाट, निंबु शिकंजी, लस्सी, छास हे पदार्थ मिळतात. हा संपूर्ण परिसर शाळा आणि कॉलेजचा आहे. त्यामुळे येथील बहुतेक पदार्थांचे दर हे तरूणाईला परवडतील असे 30 ते 60 रुपयांच्या दरम्यान आहेत. पोहे आवडणाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी आहेत भरपूर पर्याय, प्रत्येकाची चव भारी! Video ‘मुंबईतील माटुंगा परिसरात इंदुरी नमकीन चाट हा व्यवसाय सुरू केला. इंदूरमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची चव मुंबईत देण्याचा हा प्रयत्न आहे. मी लॉकडाऊनमध्ये पत्नीच्या मदतीनं ही संकल्पना तयार केली.  मध्यप्रदेश मधील इंदौर शहराला मराठीमध्ये इंदूर हा शब्द पूर्वपार वापरण्यात येतो.  त्यामुळे आम्ही या स्टॉलचं नाव इंदुरी नमकीन चाट हे ठेवलं आहे. आमचा हा स्टॉल सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतो.  या ठिकाणी सगळ्यात जास्त इंदुरी पोहे, निंबू शिकंजी प्रसिद्ध आहे. विशेषत: पोहे हा पदार्थ सकाळीच देण्याची मुंबईतील हॉटेलात पद्धत आहे. आम्ही रात्री 11 पर्यंत पोहे देतो. आमचे पोहे खाण्यासाठी रात्रीही गर्दी असते,’ अशी माहिती दिनेश पवार यांनी दिली.

गूगल मॅपवरून साभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात