Home /News /lifestyle /

कोरोनातून लवकर बरं व्हायचं आहे; आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश

कोरोनातून लवकर बरं व्हायचं आहे; आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश

कोरोनातून बरं होण्यासाठी औषधाइतकाच आहारही महत्त्वाचा आहे.

मुंबई, 06 मे : सध्या देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट (Corona Second Wave) अगदी शिगेला पोहोचली आहे. दररोज जवळपास तीन लाख नवीन कोरोनाबाधित आढळत आहेत. आतापर्यंत देशभरातील लाखो लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी अनेक भागात संपूर्ण लॉकडाउनही (Lockdown) लागू करण्यात आला आहे. साबण आणि हँडवॉशने वारंवार हात धुण्यासाठी, मास्क घालण्यासह सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं सतत आवाहन केलं जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास (Immunity) सांगितलं जात आहे. त्यासाठी महत्त्वाचा आहे तो आहार (Food for corona patient). ज्या लोकांना संसर्ग झाला आहे किंवा ज्यांना हा आजार होऊन गेला आहे त्यांना रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थ (Healthy Food) खाण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात (Diet) समावेश करावा ते पाहूयात. खिचडी आवश्य खा खिचडीला सुपर फूड म्हणूनही ओळखलं जातं. तांदूळ, डाळ आणि वेगवेगळ्या भाज्या घालून खिचडी बनवणं अतिशय सोपं असून हा साधासा पदार्थ पौष्टिकतेच्या दृष्टीनं मात्र एकदम उच्च आहे. तुम्ही आजारी असाल किंवा अशक्तपणा आला असेल तरीही सहजपणे एकट्यानं खिचडी बनवून खाऊ शकता. संत्र्याचं नियमित सेवन करा संत्र्यामध्ये (Orange) व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते, जे अँटीबॉडीज तयार करतं. आजारातून उठल्यानंतर पुन्हा ताकद येण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. रोगप्रतिकारक शक्तीसाठीही ते खूप फायदेशीर आहे. यामुळे ऊर्जा वाढते. बदाम खा बदामामध्ये (Almond) व्हिटॅमिन ई असते जे अँटीऑक्सिडेंटसनी (Antooxidents) समृद्ध असते. कोरोनामुळे शरीर खूप कमकुवत झाले असेल तर त्यातून बरे होण्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहे. हे वाचा - सारखी कॉफीची तल्लफ येते? कारण आहे तुमचं ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट : संशोधन बदामाव्यतिरिक्त तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, अॅव्हॅकॅडो आणि व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा. रोज एक अंडं आवश्यक अंड्यात (Eggs) प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. शारीरिक ताकद परत मिळवण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. यात अमिनो अॅसिड असतं जे आपल्या शरीरास आजारापासून वाचवतं. लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात असलेले बीन्स खा वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्समध्ये (Beans) लोहाची (Zink) मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकले जातात. शरीरातील लोह कमी झाल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. हे वाचा - सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला Quarantine Diet Plan कोविड विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत आपण लोहयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यावश्यक आहे.
First published:

Tags: Corona patient, Coronavirus, Food, Health, Health Tips

पुढील बातम्या