नवी दिल्ली, 5 मे: अनेक जण ताणतणाव विसरण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी तसंच एन्जॉय म्हणून दैनंदिन कॉफी पितात. परंतु, ठराविक प्रमाणात कॉफीचं (Coffee) सेवन योग्य ठरतं. प्रमाणापेक्षा अधिक कॉफी अनेकदा आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. आपण किती प्रमाणात कॉफी पिऊ शकतो, हे आपल्या आरोग्यावर (Health) अवलंबून असू शकतं असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
ब्लॅक, साखर नसलेली, काहीशी स्ट्रॉंग, फेसाळती आणि किचिंत दूध घातलेल्या कॉफीची चर्चा होते, तेव्हा प्रत्येकजण त्याची तिची आवड सांगतात. काही लोक इतरांपेक्षा जास्त कॉफी पितात. याचा जीन्सशी काहीतरी संबंध असू शकतो. जर्नल ऑफ अमेरिकन न्युट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार, आम्ही कॉफी किती प्रमाणात प्यावी हे आरोग्याचं सूचक असू शकते. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील (युनिसा-UniSA )संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंदर्भातील आरोग्यावर (CardiovascularHealth) कॉफी सेवनाने काय परिणाम होतात, याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
युके बायोबॅंकमधील डेटा वापरुन संशोधकांनी 3,90,435 लोकांच्या नियमित कॉफी वापराची तपासणी केली. त्यानंतर त्याची आधारभूत रक्तदाब पातळी (Blood Pressure)आणि हृदयाची गती यांच्याशी तुलना केली. यात अभ्यासकांना असं आढळलं की उच्च रक्तदाब, अन्जायना (Angina)असलेले लोक ही लक्षणे नसलेल्या लोकांच्या तुलनेत कॅफिन अत्यंत कमी प्रमाणात किंवा कॅफिन नसलेली कॉफी सेवन करण्यास प्राधान्य देतात किंवा कॉफी पिणं सोडून देतात.
सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला Quarantine Diet Plan
या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक आणि युनिसाच्या ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्रेसिजन हेल्थच्या संचालिका एलिना हिप्पेपन (Elina Hyppönen) यांचा एक सकारात्मक निष्कर्ष आहे. या निष्कर्षावरून असे दिसून आले आहे की, आपले जीन्स आपण सक्रियपणे सेवन केलेल्या कॉफीचे प्रमाण नियमितपणे नियंत्रित करतात. जर आपण अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन केले असेल तर त्यापासून आपले संरक्षण करतात. लोक उच्च रक्तदाब किती आहे यानुसार कॅफिन ची सुरक्षित पातळी स्वयं नियंत्रित करतात. हा कदाचित संरक्षणात्मक अनुवंशिक यंत्रणेचा परिणाम आहे,असे हिप्पेपन म्हणतात.
फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम,ऑक्सिजन लेवल सुधारण्यास होईल मदत
याचा अर्थ असा की जो कोणी व्यक्ती कमी मद्यपान करतो परंतु अधिक प्रमाणात कॉफी सेवन करतो तो अनुवंशिक दृष्टया जास्त प्रमाणात कॅफिन सहन करु शकतो,असे संशोधकांचे म्हणणे आहे. जर तुमचे शरीर तुम्हाला अतिरिक्त कॉफी न पिण्यास सांगत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकेल. त्यामुळे आपल्या शरीराचे म्हणणे ऐका. ते आपल्या आरोग्यासाठी आपल्या विचारांपेक्षा अधिक चांगले आहे,असा सल्ला एलिना हिप्पेनन यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.