सकाळी उठल्यावर ग्रीन टी: वजन नियंत्रित करण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. हे आपले मेटॅबॉलिझम सुधारेल आणि आपले वजन कमी करण्यास मदत करेल.
सिझनल फूड: पावसाळ्यात हंगामी भाज्या खा. या भाज्या कमी तेलात चांगले शिजवून किंवा कोशिंबीरीच्या रूपात तुम्ही खाऊ शकता.
लाईट डिनर: रात्रीच्या जेवणामध्ये आपण शाकाहारी सूप, मूग डाळ, या पदार्थांचा समावेश करू शकता. भाताच्या ऐवजी ओट्स खा.
लसूण: सकाळी उठून दररोज एक लसणाची पाकळी कच्चीच खाण्याची सवय लावा. जर आपण कोमट पाण्यासोबत लसूण खाल्ले तर आपले वजन वाढणार नाही.
बदाम: जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले बदाम खाल्ले तर ते तुम्हाला आरोग्यदायी ठेवतील आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतील.
फळे: जेव्हा जेव्हा फास्ट फूडची तल्लफ असेल तेव्हा केळी खा.यामध्ये असलेले घटक भूक भागवतील आणि फास्ट फूडची लालसा दूर करतील.