मुंबई, 09 डिसेंबर : एरवी आकाशाकडे (Sky) पाहिलं की दिवसा आपल्याला सूर्य आणि रात्री आपल्याला चंद्र-तारे दिसतात. पण आता लवकरच तुम्हाला आकाशात तुम्ही कधीच पाहिलं नसेल असं दृश्य दिसणार आहे. रात्री आकाशात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल. त्यामुळे ही संधी तुम्ही बिलकुल सोडू नका. आता नेमकं असं आकाशात काय दिसणार आहे आणि कधी हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. तर चंद्रासोबत (Moon) तुम्हाला आणखी पाच ग्रह (Planet) आणि दोन लघुग्रह (Asteroids) दिसणार आहेत. एरवी पुस्तकात तुम्ही ग्रहांबाबत वाचलं आहे. ग्रहांना चित्रांच्या रुपात पाहिलं आहे. तुमच्या जन्मपत्रिकेतही ग्रहांबाबत बरंच काही असतं आणि राशिभविष्य पाहत असाल तर ग्रहांबाबत वाचतच असाल. पण प्रत्यक्षात हे ग्रह कसे आहेत हे पाहण्याची ही उत्तम संधी आहे.
On Sunday (Dec. 12), five planets, two large asteroids, and the Moon will align in the night sky. Visible around the world. pic.twitter.com/u4Zdm0ob13
— Latest in space (@latestinspace) December 8, 2021
आता कोणकोणते ग्रह तुम्हाला दिसणार आहेत तर यामध्ये शुक्र (Venus), गुरू (Jupiter), शनि (Saturn), युरेनस (Uranus), नेप्च्युन (Neptune), सेरेस (Ceres), पल्लास (Pallas) या ग्रहांचा समावेश आहे. हे ग्रह तुम्हाला एका रेषेत दिसतील. हे वाचा - मरना मना है! इथं कधी कुणीच मरत नाही; धक्कादायक आहे कारण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे ग्रह कधी पाहायला मिळतील. @latestinspace ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार येत्या रविवारी म्हणजे 12 डिसेंबर, 2021 ला तुम्हाला रात्री आकाशात एका रेषेत हे ग्रह दिसतील. शुक्र, गुरू आणि शनि हे ग्रह उघड्या डोळ्यांनीही पाहता येतील. त्यासाठी टेलिस्कोपची गरज नाही. कारण चंद्रांनंतर शुक्र हा पहिला आणि गुरू हा दुसरा तेजस्वी असा ग्रह आहे. हे दोन्ही ग्रह दिसले तर त्यांच्यामध्ये असलेला ग्रह म्हणजे शनि तोसुद्धा दिसेल. पण नेप्च्युन आणि युरेनस हे ग्रह खूप अंधुक असतील. त्यामुळे ते आणि त्यासोबत इतर दोन लघुग्रह पाहण्यासाठी तुम्हाला टेलिस्कॉप किंवा बायनोक्युलर्सची गरज पडेल. हे वाचा - ज्वालामुखीचा उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पळापळ, धडकी भरवणारा VIDEO VIRAL जगभरात सर्वत्र हे ग्रह पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही असाल आणि आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला हे सुंदर दृश्य पाहायला मिळेल.