मुंबई, 8 जून : सेलिब्रिटी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. शरीर सुडौल ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. एखाद्या सेलिब्रिटीचा फिटनेस पाहून त्याच्यासारखा फिटनेस असावा, असं तुम्हालाही वाटत असेल. पण ते स्वतःचा फिटनेस जपण्यासाठी जे करतात, ते तुम्ही करता का? असा प्रश्न विचारल्यावर अनेकाचं उत्तर नाही असं येईल. पण आज आम्ही तुम्हाला अनुष्का शर्माच्या फिटनेसचं रहस्य सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला स्वतःला फिट ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. अनुष्का शर्माच नाव सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये आहे. आई झाल्यानंतरही तिनं कठोर परिश्रम करून स्वतःच शरीर पूर्वीसारखंच फिट बनवलं. या मागील कारण तिची जेवणाची वेळही आहे. एका कार्यक्रमादरम्यान, जेव्हा अनुष्कानं तिच्या जेवणाची वेळ सांगितली, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.
Cooking Oil : एकदा वापरलेले तेल वारंवार वापरणे असते घातक! पाहा किती वेळा वापरणे असते सुरक्षितसूर्यास्तापूर्वी करते जेवण नुकतीच अनुष्का पती विराट कोहलीसोबत एका कार्यक्रमासाठी आली होती. त्यावेळी ती खूपच फिट दिसत होती. यावेळी तिला तिच्या फिटनेसबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिनं सांगितलं की, ‘मी सूर्यास्ताच्या आधीच रात्रीचं जेवण करते. साधारणतः संध्याकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान माझं जेवण झालेलं असतं. त्यानंतर रात्री 9:30 पर्यंत मी झोपी जाते.’
सूर्यास्तापूर्वी जेवण्याचे ‘हे’ आहेत फायदे रात्रीचे जेवण हे सूर्यास्तापूर्वी घेण्याचे विविध फायदे आहेत. सूर्यास्तापूर्वी जेवण केल्यामुळे शरीराला अधिक आराम मिळतो, चांगली आणि पूर्ण झोप होते, झोपेच्या समस्या दूर होतात, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं, तुमची एनर्जी वाढते, स्वतःचा फोकस आणि विचार अधिक स्पष्ट राहतात. हा आहे अनुष्काचा फिटनेस मंत्र ‘प्रत्येकानं सेलिब्रेटींना आंधळेपणानं फॉलो करणं टाळावं,’ असेही अनुष्कानं स्पष्ट केलं. ‘तुमच्यासाठी सर्वोत्तम आहार आणि कसरत निवडा. कारण प्रत्येक व्यक्तीचं शरीर, आरोग्याची स्थिती आणि शारीरिक हालचाली नेहमीच भिन्न असतात,’ असंही ती म्हणाली. दरम्यान, अनुष्का शर्मा रात्रीचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी करत असल्यामुळे तिच्या दुपारच्या जेवणाची वेळ काय असेल, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. मात्र, काळजी करू नका, अनुष्का शर्माने त्याचही उत्तर दिलं आहे. तिनं सांगितलं, ‘मी माझ्या खाण्याच्या वेळा पूर्णपणे बदलल्या आहेत. मी दुपारचे जेवण सकाळी 11 ते 11:30 च्या दरम्यान करते. तर, रात्रीचे जेवण खूप लवकर केल्यामुळे मला त्याचे अनेक फायदे मिळत आहेत.’
Morning Routine : रोज सकाळी करा ही सोपी कामं, आयुष्यात नेहमी व्हाल यशस्वी आणि राहाल निरोगी!तुम्हीही अनुष्का शर्मा हिच्या सारखं फिट राहण्यासाठी तिनं दिलेला कानमंत्र लक्षात ठेऊन त्याप्रमाणे तुमची दिनचर्या ठरवू शकता.