जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उद्ध्वस्त घराच्या या चित्रात लपलाय एक अंक; शोधून पाहा सापडतो का?

उद्ध्वस्त घराच्या या चित्रात लपलाय एक अंक; शोधून पाहा सापडतो का?

Optical illusion

Optical illusion

या घरात एक अंक लपला आहे तो 15 सेकंदांत शोधून काढण्याचं आव्हान असून तुम्हाला तो अंक सापडला तर तुमची बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी आहे, असं मानलं जाईल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 14 नोव्हेंबर : इंटरनेटच्या युगात सध्या ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार खूप प्रसिद्ध होत आहे. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक फोटो व्हायरल होत असल्याचे दिसते. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोत पाहिले असता सर्वसामान्य चित्र दिसू लागते. पण यात काही ना काही गूढ असतं त्याची उकल ठराविक वेळेत करावी लागते. असं करण्यात यशस्वी ठरलात तर तुमच्या बुद्धिमत्तेला दाद मिळते. असाच एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात उद्ध्वस्त झालेलं घर दाखवण्यात आलं आहे. याच घरात एक अंक लपला आहे तो 15 सेकंदांत शोधून काढण्याचं आव्हान असून तुम्हाला तो अंक सापडला तर तुमची बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी आहे, असं मानलं जाईल. ‘एनडीटीव्ही इंडिया’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. इंटरनेटवर सध्या अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित या फोटोमधील गूढ उकलण्यासाठी अनेक लोक पुढाकारही घेत आहेत. बुद्धीचा कस लावणाऱ्या फोटोमध्ये पाहताना बऱ्याचदा भ्रम निर्माण होतो. सगळं काही समोर असतानाही दूर असल्याचा भास होतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑप्टिकल इल्युजनचं आव्हान पूर्ण करण्यात बहुतांशी लोक अपयशी ठरतात. नुकताच एक फोटो व्हायरल झाला. यात पडझड झालेल्या एका घराच्या फोटोत गणितातला एक अंक लपलेला आहे. तो भल्याभल्यांना सापडत नाही. हेही वाचा - वर्गात हरवला शिक्षकाचा चष्मा, त्याला शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत एका घरातील खोलीची अवस्था अत्यंत वाईट झालेली दिसते. खोलीतील साहित्य पूर्णपणे विखुरलेलं आणि अस्ताव्यस्त पडलेलं दिसतं. फोटो दिसते त्याप्रमाणे खोली खूप जुनी असल्याचे दिसते. या खोलीला आग लागल्याचं दिसून येतं. या फोटोत गणिताचा एक अंक लपलेला आहे. तो शोधणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. या खोलीतील खिडक्या तुटल्या आहेत. अशा स्थितीत तो अंक शोधावा तरी कुठे? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    अजूनही तो अंक सापडला नाही ना? चला आम्ही काही मदत करतो मेंदूला ताण देऊन फोटोतील प्रत्येक कोपरा पाहिला, खिडक्या, दरवाजे सगळीकडे नजर मारली तरी काही दिसत नाही ना? चला तो अंक शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. वास्तविक पाहता या फोटोतील खोलीत अगदी समोरील बाजूला असलेल्या खिडकीवर उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकाच्या कंसात इंग्रजीतील चार हा क्रमांक दिसून येईल. दरम्यान, एक सामान्य मानवी मेंदू प्रत्येक दृष्टिकोनातून भिन्न धारणा बनवून वस्तू किंवा प्रतिमा वेगळ्या पद्धतीनं पाहू शकतो. चित्रात वस्तू अगदी समोरचं असते, पण ती सहजासहजी शोधणं अवघड जातं. ऑप्टिकल इल्युजनमध्ये चित्रातील गुढ उकलताना नेहमी बुद्धीचा कस लागत असतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: game
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात