Feng Shui वास्तुशास्त्रानूसार विवाहित जोडप्यासाठी बेडरूम हे योग्य दिशेने असणं खूप महत्वाचं आहे. बेडरूमसाठी दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते. ईशान्येकडील बेडरुममध्ये दीर्घकाळ झोपणे मानसिक आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते.
त्याचबरोबर या वास्तूशास्त्रानुसार विवाहित जोडप्यांनी आपल्या बेडरूममध्ये पाण्याच्या कारंज्या किंवा इतर सजावटीच्या सामानात पाणी असायला नको. कारण ते आपल्या वैवाहिक आयुष्याला धोकादायक असते.
जर तुमच्या बेडरूममध्ये जागा असेल तर लक्षात ठेवा की बेडच्या वर कोणताही पंखा असू नये. झोपताना आपलं डोकं उत्तरेकडे ठेवून झोपू नये. जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला निद्रानाश होण्याची होण्याची शक्यता असते.
फेंगशुई वास्तुशास्त्रानूसार बेडरूममध्ये सुगंधी मेणबत्त्या ठेवायला हव्या. बेडरूममध्ये अशा कोणत्याही विचित्र गोष्टी असायला नको. नद्या, तलाव, धबधबे यांची चित्रे बेडरूममध्येही नसावीत. त्याचबरोबर देव देवतांचेही फोटो घरात लावू नये.
आपल्या बेडरूममध्ये सतत प्रकाश असायला हवा. दिवस असेल तर सुर्यप्रकाश अथवा लाईटचा प्रकाश असेल तर आपले वैवाहिक जीवन सुखकर होते.
विवाहित जोडप्यांनी बेडरूममध्ये दरवाज्याकडे पाय करून झोपू नये. त्याचबरोबर पलंगाच्या दोन्ही बाजूला पेपरची रद्दी किंवा आरसा ठेऊ नये.